शिक्षणाच्या जिद्दीसमोर सगळं काही दुय्यम, आई लग्न लावून देतेय म्हणून तिघींनीही सोडलं घर

मनात शिकण्याची इच्छा असूनही आई लग्न लावून देत असल्याने तिनही बहिणींनी घरातून चक्क पलायन केल्याची घटना घडली आहे. घरातून पळून गेल्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर या मुलींचा शोध लागला.

शिक्षणाच्या जिद्दीसमोर सगळं काही दुय्यम, आई लग्न लावून देतेय म्हणून तिघींनीही सोडलं घर


ठाणे : मनात शिकण्याची इच्छा असूनही आई लग्न लावून देत असल्याने तिनही बहिणींनी घरातून चक्क पलायन केल्याची घटना घडली आहे. घरातून पळून गेल्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर या मुलींचा शोध लागला. जिल्ह्यातील कल्याणमध्ये हा प्रकार घडला. (three sisters run away from home as their mother was trying to marrying them against their desire)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूव्रेतील नेतिवली परिसरात राहणाऱ्या तीन सख्ख्या बहिणी घरातून अचानक बेपत्ता झाल्या. मुलींना वडील नसल्यामुळे या तीनही बहिणींचा सांभाळ त्यांची आईच करते. तिन्ही बहिणी एकाच वेळी अचानक बेपत्ता झाल्याने आई हवालदिल झाली. शोध घेऊनही मुली सापडत नसल्याने शेवटी आईने कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत मुली हरवल्याची तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्या दिशेने तपास सुरु केला.

मुलींना शोधण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज साळवे यांनी एक तपास पथक तयार केलं. मुलींना शोधण्याची जबाबदारी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वाघ यांच्यावर सोपविण्यात आली. त्या अनुशंगाने किरण वाघ यांनी शोधमोहीम सुरु केली.

मोबाईल लोकेशनच्या मदतीने मुलींचा शोध

पोलिसांनी मुलींचा शोध घेण्यासाठी मोबाईल लोकेशनचा उपयोग केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे या तिघींचेही लोकेशन ट्रॅक केले. घरातून निघून गेल्यापासून दोन दिवसानंतर या तिन्ही बहिणी एका व्यक्तीच्या संपर्कात आल्या. सुदैवाने ज्या व्यक्तीच्या संपर्कात या मुली होत्या त्याच्या संपर्कात कोळसेवाडी पोलीस होते. पोलिसांच्या सांगण्यावरुन तो व्यक्ती या तिघींना घरी परतण्यासाठी समजावत होता. मात्र, मुली घरी जाण्यासाठी तयार नव्हत्या. दरम्यान तिन्ही मुली पनवेल बसस्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. मुलींचे लोकेशन ट्रॅक होताच पोलिसांनी मुलींना गाठले.

त्यानंतर पोलिसांनी या मुलींना कल्याणला आणून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांच्या आईला सुपूर्द केले. यावेळी आपल्या तिन्ही मुली सुखरुप पाहूव मुलींच्या आईचे अश्रू अनावर झाले. मुलींच्या आईचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ यांनी सांगितले की, तिघींपैकी सर्वात मोठ्या मुलीच्या लग्नाची तिच्या आईने तयारी केली होती. आपली आई लग्न लावून देणार आहे, याची चाहू तिला लागली होती. मात्र, मुलीला शिकायचे असल्यामुळे शेवटी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बहिणी तिच्याशिवाय राहू शकत नव्हत्या. त्यामुळे बाकीच्या दोघीसुद्धा मोठ्या मुलीसोबत घराबाहेर पडल्या.

दरम्यान, मुलीच्या शिक्षणाच्या जिद्दीची सर्व स्तरांतून वाहवा केली जात आहे. तसेच आपल्या तिन्ही मुली ऐन दिवाळीच्या दिवशी सुखरुप परत आल्याने दिवाळीची अनोखी भेट मिळाल्याची भावना तिच्या आईकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

नालासोपाऱ्यात 6 वर्षीय मुलगी बेपत्ता, नाल्याकडेला खेळणी सापडल्याने वाहून गेल्याची भीती

राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेऱ्यात कैद

उच्चभ्रू वस्तीत राहणारी मुलगी बेपत्ता, तब्बल नऊ महिन्यानंतर खुनाचा उलगडा, नातेवाईकांना अटक

(three sisters run away from home as their mother was trying to marrying them against their desire)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI