किरकोळ वादातून हत्येचा प्रयत्न, ‘टिकटॉक’ स्टार अटकेत

टिकटॉक व्हिडीओमध्ये कीर्तीच्या मैत्रिणीने भरवाड समाजाला उद्देशून अपशब्द वापरला होता. यामुळे संतप्त समाजासोबत तिची वादावादी झाली TikTok Star Kirti Patel Arrested

किरकोळ वादातून हत्येचा प्रयत्न, 'टिकटॉक' स्टार अटकेत
Follow us
| Updated on: Mar 04, 2020 | 9:28 AM

गांधीनगर : गुजरातमधील प्रसिद्ध ‘टिकटॉक’ स्टार कीर्ती पटेल हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत आहे. दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाचं पर्यवसन हत्येच्या प्रयत्नात झाल्याचा आरोप आहे. (TikTok Star Kirti Patel Arrested)

सुरतला राहणारी कीर्ती पटेल ‘टिकटॉक’ व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करत असे. कीर्तीला संपूर्ण गुजरातमध्ये लोकप्रियता मिळाली होती. टिकटॉक व्हिडीओमध्ये कीर्तीच्या मैत्रिणीने भरवाड समाजाला उद्देशून अपशब्द वापरला होता. यामुळे संतप्त समाजासोबत तिची वादावादी झाली.

कीर्ती पटेल आणि भरवाड समाजातील व्यक्तींकडून एकमेकांना मारहाणीच्या धमक्या देण्यात आल्या. विशेष म्हणजे ‘टिकटॉक’वर दोन्ही गटांमध्ये चढाओढ रंगली. अखेर, वादावर तोडगा काढण्यासाठी कीर्तीने तिच्या साथीदारांसह भरवाड समाजासोबत बैठक घेतली. मात्र त्याचवेळी दोन्ही गटात मारहाण सुरु झाली.

कीर्ती पटेलच्या बाजूने असलेल्या कनू भरवाडे याने रघू भरवाडच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर जखमी झालेल्या रघूने पूनागाम पोलिसात कीर्ती आणि तिच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी टिकटॉक स्टार कीर्ती पटेल आणि तिच्या साथीदारांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कीर्तीसह तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. (TikTok Star Kirti Patel Arrested)

हेही वाचा : टिक-टॉक स्टारच्या बर्थडेनिमित्त परळीमध्ये ‘टिकटॉक’ कलाकारांचा मेळा

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.