पुण्यात मतदान करतानाचा Tik Tok व्हिडीओ व्हायरल

पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघात मतदान करताना एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना घडली (TikTok Video during voting) आहे.

पुण्यात मतदान करतानाचा Tik Tok व्हिडीओ व्हायरल


पुणे : पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघात मतदान करताना एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना घडली (TikTok Video during voting) आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना मतदान केल्याचा एका उत्साही कार्यकर्त्याने व्हिडीओ पोस्ट (TikTok Video during voting) केला आहे.

राज्यात मोठ्या उत्साहात मतदान सुरु आहे. निवडणूक आयोगाने मतदान (Maharashtra Assembly election 2019) केंद्रावर मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई केली आहे. असे असताना पुण्यात आघाडीच्या एका कार्यकर्त्याने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन गेला. त्याने ईव्हीएमवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांना घडळ्याचे चिन्ह दाबून मतदान (Maharashtra Assembly election 2019) केले. त्यानंतर व्हीव्हीपॅटवरही त्याने कॅमेरा फिरवत सुनील टिंगरे यांना मतदान केल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे मतदान करतेवेळी हा कार्यकर्ता पुणे शहरात इतिहास घडणार, आपले सुनील टिंगरे आमदार होणार असेही संगीतही त्या व्हिडीओला दिलं. यानंतर त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (TikTok Video during voting) केला.

दरम्यान पुणे पोलीस हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. टिक टॉकसाठी हा व्हिडीओ व्हायरल केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI