कोल्हापुरात मोठा बॉम्बसाठा जप्त, 69 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ

कोल्हापुरात मोठा बॉम्बसाठा जप्त, 69 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ

विधानसभा निवडणुकांच्या मतदानानंतर कोल्हापुरात मोठा बॉम्ब साठा आढळला (Kolhapur Bomb seized)  आहे. कोल्हापुरातील माले मूडशिंगी या गावात 69 गावठी बॉम्ब सापडले आहेत.

Namrata Patil

|

Oct 23, 2019 | 8:59 AM

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकांच्या मतदानानंतर कोल्हापुरात मोठा बॉम्ब साठा आढळला (Kolhapur Bomb seized)  आहे. कोल्हापुरातील माले मूडशिंगी या गावात 69 गावठी बॉम्ब सापडले आहेत. यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांकडून सविस्तर चौकशी सुरु (Kolhapur Bomb seized) आहे.

विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली बॉम्ब स्फोट झाला होता. त्यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. तसंच विधानसभेच्या मतदानादिवशी कोल्हापुरात बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती.

यानंतर पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरु केली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांना शिकारीसाठी बॉम्ब वापरत असल्याची माहिती (Kolhapur Bomb seized) मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी माले मूडशिंगी गावात कारवाई केली. यात पोलिसांनी 69 गावठी बॉम्ब जप्त केले. हे बॉम्ब रानडुकारांच्या शिकारीसाठी वापरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या कारवाईदरम्यान विलास जाधव, आनंदा जाधव अशा दोन संशयित व्यक्तींना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें