एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं? हा भाऊ तुमच्यासोबत: उदयनराजे

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी राज्यापासून केंद्रापर्यंतचे मंत्री हजेरी लावत आहेत.

एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं? हा भाऊ तुमच्यासोबत: उदयनराजे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 18, 2019 | 6:31 PM

बीड: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी राज्यापासून केंद्रापर्यंतचे मंत्री हजेरी लावत आहेत. आता माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale in Parali Beed) यांनीही परळीत प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं, हा भाऊ तुमच्यासोबत असल्याचं म्हणत पाठिंबा दिला. मी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठीच आलो आहे, मी असाच परत जाणार नाही, असंही उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale in Parali Beed) सांगितलं.

पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेला जाताना प्रितम मुंडे आणि उदयनराजे भोसले.

उदयनराजेंनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “पंकजा मुंडे माझ्या बहिण आहेत. माझी बहिणीने गोपीनाथ मुंडेंना शोभेल असं काम केलं आहे. एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं, हा भाऊ तुमच्यासोबत आहे. मी माझ्या बहिणींची पाठराखण करणार आहे. मी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठीच आलो आहे, मी असाच परत जाणार नाही. गोपीनाथ मुंडेंना धोका देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. अशा लोकांना आडवा आणि त्यांची जिरवा.” यावेळी उदयनराजेंनी “एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नही सुनता” या डायलॉगचाही पुनरुच्चार केला.

मी पवारसाहेबांना धोका दिला : उदयनराजे भोसले

उदयनराजेंनी एकीडकडे धनंजय मुंडेंवर गोपीनाथ मुंडेंना धोका दिल्याचा आरोप करत सडकून टीका केली. दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धोका दिला नसल्याची सारवासारवही केली. मी शरद पवारांना धोका दिला नाही. माझी बांधिलकी समाजातील लोकांशी आहे. मी कोणाला धोका दिला नाही, तर मलाच धोका दिला गेला. मी पक्ष बदलला नाही. कारण इथं फक्त जनता हाच माझा पक्ष आहे. बाकी मी कोणालाही मोजत नसतो.”

मराठा स्ट्राँग मॅन म्हणवून घेणाऱ्यांनी मराठ्यांसाठी काय केलं? असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवरही निशाणा साधला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने फक्त राजकारण केलं. त्यापलीकडं काहीच केलं नाही, असाही आरोप त्यांनी केला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें