मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले: उद्धव ठाकरे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray in Dasara Melava) विरोधकांना चांगलेच लक्ष्य केले.

मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले: उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray in Dasara Melava) विरोधकांना चांगलेच लक्ष्य केले. आजपर्यंत मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले, अशीही जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली. तसेच विशेष कायदा करुन राम मंदिर बांधण्याची मागणी (Demand of Ram Mandir) केली. यावेळी मंचावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई असे अनेक नेते उपस्थित होते.

LIVE Updates

 • राम मंदिर कोर्टाने चांगला न्याय दिला तर आनंद आहे, नाहीतर विशेष कायदा करा आणि राम मंदिर बांधा : उद्धव ठाकरे
 • राम मंदिरासाठी आम्ही वचनबद्ध आहोत : उद्धव ठाकरे
 • आम्ही वचने पाळली नाही, तर ते रामालाही पटणार नाही : उद्धव ठाकरे
 • आता धनगराच्या काठीला तलवारीची धार आली पाहिजे : उद्धव ठाकरे
 • सत्ता मला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे : उद्धव ठाकरे
 • देशावर प्रेम करणारे मुसलमानही आहेत, ते सोबत आले तर त्यांनाही न्याय हक्क मिळवून देऊ : उद्धव ठाकरे
 • शरद पवार, चंद्राबाबू, मुलायम, मायावती यांची पंतप्रधान पदासाठी भांडणं म्हणून मोदींना पाठिंबा : उद्धव ठाकरे
 • मी माझी ताकद काँग्रेसमागे कधीही उभी करणार नाही : उद्धव ठाकरे
 • महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युती स्वीकारली, उत्तर प्रदेशात सपा-बसपाची युती नाकारली. कारण ते सत्तेसाठी एकत्र आले होते : उद्धव ठाकरे
 • आम्ही युती हिंदुत्वासाठी केली : उद्धव ठाकरे
 • जो पर्यंत आम्ही काँग्रेसचे टार्गेट आहोत, तोपर्यंत तेही आमचे टार्गेट राहणार : उद्धव ठाकरे
 • काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनो आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने राहा : उद्धव ठाकरे
 • अजित पवारांच्या कर्माने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आजपर्यंत मगरीच्या डोळ्यात असं पाणी पाहिलं होतं: उद्धव ठाकरे
 • अजित पवारांच्या डोळ्यात आज पाणी येतंय, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, तेव्हा तुम्ही कुठलं पाणी दाखवलं होतं?: उद्धव ठाकरे
 • आज ईडीचं राजकारण पवार तुम्हाला सुडाचं वाटतं , मग 2000 साली महाराष्ट्राला का छळलं ? : उद्धव ठाकरे
 • फक्त शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांच्या जोरावर ही मुंबई आणि हिंदू वाचवला : उद्धव ठाकरे
 • हिंदुंना वाचवणारे गुन्हा म्हणणारी तुम्ही अवलाद, आज तुम्हाला सुडाचं राजकारण वाटतं? : उद्धव ठाकरे
 • तुमचं सरकार असताना यंत्रणा कोणाकडे होत्या? : उद्धव ठाकरे
 • शिवसैनिकांची नालबंदी करणारी तुमची अवलाद आज तुम्हाला भूमिपुत्र आठवतो? : उद्धव ठाकरे
 • मी पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार : उद्धव ठाकरे
 • युवा शक्तीला काम मिळालं पाहिजे, नाही तर युवा बॉम्ब म्हणून पुढे येतील : उद्धव ठाकरे
 • आजपर्यंत युवकांनीच इतिहास घडवला आहे. त्यामुळे युवकांनो पुढे या : उद्धव ठाकरे
 • युतीत काही जागा आपल्याकडून सुटल्या, त्या शिवसैनिकांची माफी मागतो : उद्धव ठाकरे
 • मला भगवं वादळ दाखवून द्यायचं आहे : उद्धव ठाकरे
 • सत्ता येते, जाते पण डोक्यात सत्ता गेली, तर रस्त्यावरचं कुत्रंही विचारत नाही : उद्धव ठाकरे
 • शिवसैनिकांनो उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही : उद्धव ठाकरे