अमेरिकन सैन्याचा आयसिसच्या तळांवर हल्ला, म्होरक्या बगदादीचा खात्मा झाल्याची चिन्हं

अमेरिकन सैन्याचा आयसिसच्या तळांवर हल्ला, म्होरक्या बगदादीचा खात्मा झाल्याची चिन्हं

अमेरिकन सैन्याने शनिवारी आयसिसच्या तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन आपण मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले आहेत

अनिश बेंद्रे

|

Oct 27, 2019 | 10:17 AM

न्यूयॉर्क : आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्या ठिकाण्यांवर अमेरिकन सैन्याने हल्ला केला आहे. सिरीयामध्ये शनिवारी अमेरिकेने केलेल्या कारवाईत बगदादीचा खात्मा झाल्याची आनंदवार्ता (Abu Bakr Al Baghdadi Killed) समोर येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील.

वायव्य सिरीयात बगदादीच्या असलेल्या ठिकाण्यांवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने सैन्याने शनिवारी हल्ला केला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन आपण मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. डीएनए चाचणीमध्ये मृतदेह बगदादीचाच असल्यावर शिक्कामोर्तब होताच ट्रम्प त्याबाबत जाहीर करतील.

गेल्या पाच वर्षांपासून बगदादी लपून बसल्याची माहिती आहे. जुलै 2014 मध्ये बगदादीचं दर्शन घडल्यानंतर पाच वर्ष त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु एप्रिल 2019 मध्ये मोसुलमधील मशिदीत बगदादी बोलतानाचा व्हिडीओ समोर आला.

पाकिस्तानचा पुळका, भारताने तुर्कीचा शस्त्र पुरवठा थांबवला

मे 2017 मध्ये झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये बगदादी गंभीर जखमी झाला होता, असा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे पाच महिन्यांच्या कालावधीत त्याची आयसिसवरील पकड सैल झाल्याचंही म्हटलं जात होतं. पंरतु आता अमेरिकन सैन्याच्या कारवाईत त्याचा खात्मा झाल्याची शक्यता (Abu Bakr Al Baghdadi Killed) आहे.

2010 मध्ये बगदादीने आयएसआय (इस्लामिक स्टेट ऑफ इराक) चं नेतृत्व हाती घेतलं होतं. 2013 मध्ये ‘अल कायदा’शी हातमिळवणी करत नवी दहशतवादी संघटना स्थापन केली. याचं नामकरण ‘आयएसआयएल’ किंवा ‘आयएसआयएस’-आयसिस असं करण्यात आलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें