बाईकवर चालतं फिरतं एटीएम, आवाज ऐकताच पैसे बाहेर

Nupur Chilkulwar

|

Updated on: Oct 16, 2019 | 1:25 PM

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीला मॉडिफाय केलं. या बाईकला अशा प्रकारे मॉ़डिफाय करण्यात आलं आहे की, आवाज ऐकताच यातून पैसे बाहेर पडतात (Bike works on voice commands). यामध्ये एक मिनी एटीएम मशीन बसवण्यात आलं आहे.

बाईकवर चालतं फिरतं एटीएम, आवाज ऐकताच पैसे बाहेर
Follow us

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीला मॉडिफाय केलं. या बाईकला अशा प्रकारे मॉ़डिफाय करण्यात आलं आहे की, आवाज ऐकताच यातून पैसे बाहेर पडतात (Bike works on voice commands). यामध्ये एक मिनी एटीएम मशीन बसवण्यात आलं आहे. या मिनी एटीएम मशीनमधून मालकाचा आवाज ऐकताच नाणी बाहेर येतात. त्यामुळे आपण या बाईकला ‘वंडर बाईक’ म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही (Bike works on voice commands).

ही बाईक मोहम्मद सईद नावाच्या व्यक्तीची आहे. त्यांनी त्यांच्या या ‘वंडर बाईक’चं नाव ‘टार्झन’ ठेवलं आहे. या बाईकमध्ये त्यांनी एक मिनी एटीएम मशीन बसवली आहे. ही एटीएम मशीन कुठल्या कार्डवर नाही तर मोहम्मद सईद यांच्या आवाजावर चालते. मोहम्मद सईद यांचा आवाज ऐकताच या मशीनमधून सईद सांगतील तितक्या रुपयांची नाणी बाहेर पडतात (Mini ATM Bike).

या बाईकचा व्हिडीओ हनी सक्सेना नावाच्या युझरने युट्यूबवर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओला ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर शेअर केलं जात आहे. या व्हिडीओमध्ये 70 वर्षीय मोहम्मद सईद त्यांच्या या बाईक ‘टार्झन’चा डेमो देते आहेत.

मोहम्मद सईद यांचा आवाज ऐकून बाईक सुरु होते आहे आणि गाणीही सुरु होत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांच्या आवाजावर या मिनी एटीएम मशीनमधून 5, 10 रुपयाची नाणी बाहेर येतानाही दिसत आहे.

युट्यूब डिस्क्रिप्शननुसार, मोहम्मद सईद हे स्वत: एक प्रशिक्षित इलेक्ट्रीशिअन, स्टंट मन आणि सेल्स मन आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत युट्यूबवर 29 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. लोकं मोहम्मद सईद यांच्या क्रिएशनचं खूप कौतुक करत आहेत.

एका युझरने लिहिलं, ‘देशी इंजीनिअरिंगचं जबरदस्त उदाहरण’, तर एकाने लिहिलं, ‘भारताची अतुल्य प्रतिभा’. तर अनकांनी या बाईच्या प्रामाणिकतेवरही प्रश्न उपस्थित केले. ‘ही बाईक मला फेक वाटत आहे’, असं एका युट्यूब युझरने लिहिलं.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI