मुंबई-पुणे गुंडाळल्यानंतर मुंबई-दिल्ली हायपरलूपसाठी प्रस्ताव, विमानापेक्षा जलद प्रवास

दिल्ली आणि मुंबई दरम्यान 1300 किलोमीटरची हायपरलूप लाइन विकसित करण्याची विनंती व्हर्जिन कंपनीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना केल्याची माहिती आहे

मुंबई-पुणे गुंडाळल्यानंतर मुंबई-दिल्ली हायपरलूपसाठी प्रस्ताव, विमानापेक्षा जलद प्रवास
Follow us
| Updated on: Feb 17, 2020 | 12:52 PM

नवी दिल्ली : ‘व्हर्जिन’ समूहाचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा हायपरलूप ट्रान्सपोर्ट प्रकल्प सुरु करण्याची गळ ब्रॅन्सन यांनी घातली आहे. मुंबई-पुणे मार्गावरील ‘व्हर्जिन’ कंपनीच्या प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पाचं कामकाज बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने गेल्या महिन्यात घेतल्यानंतर ब्रॅन्सन यांनी पर्यायी मार्ग (Mumbai Delhi Hyperloop Proposal) सुचवला आहे.

नव्या तंत्रज्ञानाचं खुलेपणाने स्वागत करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरींशी ‘व्हर्जिन’ समूहाने संपर्क साधला. दिल्ली आणि मुंबई दरम्यान 1300 किलोमीटरची लाइन विकसित करण्याची गडकरींना विनंती करण्यात आली. पुढील दोन दिवस ‘व्हर्जिन’ समूहाचे अधिकारी भारतात आहेत. तंत्रज्ञानासाठी विविध गुंतवणूकदारांची भेट ते घेत आहेत, असं वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलं आहे.

हायपरलूप म्हणजे नेमकं काय?

‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसाठी कमी दाबाचा चॅनेल किंवा बोगदा तयार करायचा. अगदी कमी हवेच्या घर्षणासह खास डिझाइन केलेल्या ‘पॉड’मधून (ट्रेनसदृश) वाहतूक करायची. हे पॉड चाकांवर नव्हे तर हवेवर धावतील.

हायपरलूप व्यवस्था निर्माण करणं वाटतं तितकंही सोपं नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याच शहराला यश मिळालेलं नाही. अबुधाबी आणि चीनमधील गिझाऊ प्रांताने ‘एचटीटी’ कंपनीची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. यूएसमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील हायपरलूप प्रकल्प मंद गतीने सुरु आहे.

हायपरलूप तंत्रज्ञानामुळे बाराशे किलोमीटर प्रतितास वेगाने अंतर गाठता येऊ शकतं. म्हणजेच मुंबईहून दिल्लीला अवघ्या सव्वा तासांच्या आत पोहचता येऊ शकेल. सध्या विमानाने मुंबई-दिल्ली अंतर कापण्यास दोन तासांचा अवधी लागतो. हायपरलूपच्या माध्यमातून कदाचित हा कालावधी आणखी कमी करता येऊ शकतो.

नितीन गडकरींना यासंदर्भात अधिकृत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. मात्र बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी काही गुंतवणूकदारांना भेटल्याची माहिती खुद्द नितीन गडकरींनी गुरुवारी एका कार्यक्रमात दिली होती.

हायपरलूप या महागड्या प्रकल्पापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी या घडीला महत्त्वाची आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं होतं. तर, हा प्रकल्प जगात कुठेही झाला नाही. आधी जगात हा प्रकल्प होऊ द्या. पुणे-मुंबई मार्गासाठी आपल्यावर प्रयोग कशाला? हा प्रकल्प राज्याला परवडणारा नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं होतं.

फडणवीस सरकारने मान्यता दिलेला मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प ठाकरे सरकारने गुंडाळला असला, तरी दोन राजधान्यांना जोडणारा मार्ग येत्या काही वर्षांत दृष्टीपथात (Mumbai Delhi Hyperloop Proposal) येऊ शकतो.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.