Visakhapatnam Gas leak : विशाखापट्टणममध्ये वायूगळती, चिमुरड्यासह पाच जण दगावले, 100 जण रुग्णालयात

विशाखापट्टणम शहरातील आरआर वेंकटपुरम या गावात एलजी पॉलिमर कंपनीच्या केमिकल गॅस प्लांटमध्ये वायुगळती झाली (Visakhapatnam LG Polymers industry Gas leak)

Visakhapatnam Gas leak : विशाखापट्टणममध्ये वायूगळती, चिमुरड्यासह पाच जण दगावले, 100 जण रुग्णालयात
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 10:14 AM

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये कारखान्यातून वायू गळती झाल्याने हाहाकार उडाला आहे. आरआर वेंकटपुरम गावात असलेल्या ‘एलजी पॉलिमर्स इंडिया’ कंपनीत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रासायनिक वायू गळती झाली. यामध्ये एका चिमुरड्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचं दुर्दैवी वृत्त आहे. जवळपास दोनशे नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे. (Visakhapatnam LG Polymers industry Gas leak)

विशाखापट्टणम शहरातील आरआर वेंकटपुरम या गावात एलजी पॉलिमर कंपनीचा केमिकल गॅस प्लांट आहे. या प्लांटजवळील रहिवाश्यांनी डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार सुरुवातीला केली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

दरम्यान, गॅसगळती थांबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. वायूचा कमाल प्रभाव सुमारे एक ते दीड किमी परिसरात होता, तर वास दोन ते अडीच किमी भागात पसरला होता. 100 ते 120 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवला असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

1961 मध्ये ‘हिंदुस्थान पॉलिमर’ नावाने स्थापना केली गेलेली ही कंपनी दक्षिण कोरियाच्या एलजी केमने ताब्यात घेतली आणि 1997 मध्ये एलजी पॉलिमर्स इंडिया असे नामकरण केले. प्लांटमध्ये पॉलिस्टीरिन बनवले जाते. हे प्लास्टिक खेळण्यांसारखी ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. (Visakhapatnam LG Polymers industry Gas leak)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.