इम्रान खानला दिवसा तारे दाखवणाऱ्या विदिशा मैत्रा कोण आहेत?

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा (IFS Vidisha Maitra) यांनी भारताची बाजू मांडली आणि भारतावर केलेल्या आरोपांचा समाचारही घेतला. इम्रान खानचा खरा चेहरा पुन्हा एकदा सदस्य राष्ट्रांसमोर आणला.

इम्रान खानला दिवसा तारे दाखवणाऱ्या विदिशा मैत्रा कोण आहेत?
Follow us
| Updated on: Sep 28, 2019 | 3:09 PM

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या द्वेषपूर्ण भाषणाला सडेतोड उत्तर दिलं. ‘राईट टू रिप्लाय’चा वापर (IFS Vidisha Maitra) करत संयुक्त राष्ट्रात (यूएन) परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा (IFS Vidisha Maitra) यांनी भारताची बाजू मांडली आणि भारतावर केलेल्या आरोपांचा समाचारही घेतला. इम्रान खानचा खरा चेहरा पुन्हा एकदा सदस्य राष्ट्रांसमोर आणला.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणात फक्त आणि फक्त द्वेष दिसत होता. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा चुकीचा वापर केला, असं विदिशा मैत्रा (IFS Vidisha Maitra) म्हणाल्या. इम्रान खान यांनी जवळपास 50 मिनिटे यूएनजीएमध्ये काश्मीर आणि मुस्लीम कट्टरतावादावर भाषण केलं. यामध्ये त्यांनी भारतावर आरोपही केले. पण विदिशा यांनी फक्त पाच मिनिटात इम्रान खानच्या 50 मिनिटांच्या भाषणाची पोलखोल केली, ज्याने इम्रान खानला दिवसा चंद्र दिसला.

कोण आहेत विदिशा मैत्रा?

विदिशा मैत्रा (IFS Vidisha Maitra) या भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच आयएफएस 2009 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी 2008 मध्ये यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा पास केली होती. देशात त्यांची 39 वी रँक असताना त्यांनी आयएफएसमध्ये सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. 2009 मध्ये त्यांना परराष्ट्र मंत्रालयात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कारही मिळाला.

‘परमनंट मिशन ऑफ इंडिया टू द यूएन’च्या अधिकृत वेबसाईटनुसार, विदिशा यूएनमध्ये भारतीय मिशनच्या सर्वात कनिष्ठ सदस्य आहेत. प्रथम सचिव म्हणून विदिशा मैत्रा (IFS Vidisha Maitra) यांची जबाबदारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेशी जोडलेली आहे. यूएनमध्ये त्या सुरक्षा परिषद सुधारणा आणि सुरक्षा परिषदेशी संबंधित प्रादेशिक मुद्दे पाहतात. याशिवाय विशेष राजकीय मिशन्समध्येही विदिशा यांची महत्त्वाची भूमिका असते.

गटनिरपेक्ष देशांमध्ये समन्वय स्थापन्यासोबतच विदिशा मैत्रा शांघाय समन्वय संस्था म्हणजेच एससीओचीही जबाबदारी सांभाळतात. महाविद्यालयीन जीवनापासूनच समन्वय साधणं ही विदिशा यांची आवड राहिल्याचं बोललं जातं.

विदिशा मैत्रा गरजल्या

यूएनमध्ये राईट टू रिप्लायचा वापर करत विदिशा मैत्रा (IFS Vidisha Maitra) म्हणाल्या, संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेल्या व्यक्तीला पेन्शन देणारं पाकिस्तान हे जगातलं एकमेव सरकार आहे हे तरी तुम्ही मान्य कराल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भारताच्या अंतर्गत प्रकरणांपासून दूर रहावं, असा सल्लाही विदिशा यांनी इम्रान खानला दिला. “आपली वकिली करावी अशा कुणाचीही भारताच्या नागरिकांना गरज नाही. किमान त्यांची तर मुळीच नाही, ज्यांनी द्वेषाच्या विचारधारेमुळे दहशतवादाचा कारखाना निर्माण केला आहे.”

“UNGA मध्ये इम्रान खान यांचं भाषण दुर्दैवी असून दहशतवादाचा कारखाना चालवणाऱ्याकडून कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. संयुक्त राष्ट्राने आपल्या यादीत समावेश केलेले 155 दहशतवादी सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. पण पाकिस्तान मानवाधिकारांचा चॅम्पियन बनण्याच्या प्रयत्नात आहे. ‘ते’, जे एकेकाळी क्रिकेटर होते आणि जेंटलमनच्या खेळावर विश्वास ठेवत होते. पण आज त्यांचं भाषण असभ्यतेच्या अंतिम टोकाला पोहोचलं आहे, जे दारा आदम खलच्या बंदुकीची आठवण करुन देतं,” असं म्हणत विदिशा (IFS Vidisha Maitra) यांनी पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला घाम फोडला.

दारा आदम खल काय आहे?

दारा आदम खल हे पाकिस्तानमधील एक ठिकाण आहे, जे पेशावरपासून दक्षिणेला 35 किमी अंतरावर आहे. ही जागा जगभरात घातक शस्त्रांच्या काळ्या बाजारासाठी ओळखली जाते. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यंत महागडी मानली जाणारी क्लाशिनिकोव रायफलही बनवली जाते.

जगभरात महागडी मिळणारी क्लाशिनिकोव रायफल दारा अदम खलमध्ये स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त मिळते असं बोललं जातं. पाकिस्तानमधील या ठिकाणावर गेल्या कित्येक दशकांपासून गुन्हेगारी कृत्य होतात. दारा अदम खेलची ओळख शस्त्रांच्या तस्करीसोबतच ड्रग्सच्या काळ्याबाजारासाठीही आहे. विद्यापीठांच्या खोट्या डिग्रीही इथे विकल्या जातात.

1980 मध्ये हा बाजार सुरु झाला. पण मुजाहिद्दीनने अफगाणिस्तानमध्ये सोवियत संघाशी लढण्यासाठी शस्त्र खरेदी सुरु केल्यानंतर हे ठिकाण जगाला माहित झालं. यानंतर या जागेवर पाकिस्तानी तालिबानने कब्जा केला आणि स्वतःचा कायदा लागू केला. नवाज शरीफ यांच्या सरकारने या जागेवर काही कठोर कायदे बनवल्यानंतर शस्त्र निर्मात्यांमध्ये नाराजी होती. पण पाकिस्तानमध्ये अजूनही या जागेवर घातक शस्त्रांचा काळा बाजार जाहीरपणे होतो, ज्याचा दाखला विदिशा यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत दिला.

VIDEO : विदिशा मैत्रा यांनी दिलेलं उत्तर

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.