रक्ताचं नातं नाही; पण पवार कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात मान; ‘या’ आजीबाई कोण?

प्रत्येकाच्या आयुष्यात रक्ताची नाती तर असतातच. मात्र काही व्यक्तींच्या आयुष्यात रक्ताच्या नात्यांसोबतच रक्ताची नसलेली नातीही तेवढीच महत्त्वाची ठरतात.

रक्ताचं नातं नाही; पण पवार कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात मान; 'या' आजीबाई कोण?

पुणे : प्रत्येकाच्या आयुष्यात रक्ताची नाती तर असतातच. मात्र काही व्यक्तींच्या आयुष्यात रक्ताच्या नात्यांसोबतच रक्ताची नसलेली नातीही तेवढीच महत्त्वाची ठरतात. या नात्यांमध्येही घट्ट ऋणानुबंध असलेला पाहायला मिळतात. असंच काहीसं नातं पवार कुटुंबीय आणि पवार कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात (Grandmother who present in Pawar family function) दिसणाऱ्या एका आजीबाईंचं आहे. इंदुबाई झारगड असं या आजीबाईंचं नाव आहे. इंदुबाई पवार कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात (Grandmother who present in Pawar family function) पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच वावरताना दिसतात.

मागील 50 वर्षांहून अधिक काळ इंदुबाई झारगड यांनी पवार कुटुंबात घालवली आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून ते अलीकडील काळात पार्थ आणि जय पवार यांच्यापर्यंत अनेक व्यक्तींचा त्यांच्या बालपणात सांभाळ केला आहे. त्यामुळंच पवार कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात इंदुबाई या कुटुंबातील सदस्य म्हणूनच वावरताना दिसतात.

पवार कटुंब 5 दशकाहून अधिक काळ राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेलं कुटूंब आहे. इंदुबाई झारगड यांनी देखील या कुटुंबात मागील 50 वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार आणि अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार यांच्या काळात इंदुबाई पवार कुटुंबीयांकडे आल्या. त्यानंतर त्यांनी पवार कुटुंबात राहून अगदी अजित पवारांपासून नव्या पिढीतील पार्थ आणि जय पवारांपर्यंतच्या पिढीचा सांभाळ केला.

इंदुबाई आता त्या आपल्या गावी म्हणजेच इंदापूर तालुक्यातल्या काझड येथे वास्तव्य करतात. मात्र, पवार कुटुंबातील कोणताही कार्यक्रम असला की इंदूबाईना विशेष निमंत्रण दिलं जातं. सोबतच पवार कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडून त्यांना खास पोशाखही दिला जातो.

अजित पवार 2 वर्षांचे असल्यापासून इंदूबाईंनी त्यांचा सांभाळ केला. त्याचबरोबर पवार कुटूंबातील इतर भावंडांनाही इंदूबाईंनी सांभाळलं. त्यामुळं या कुटुंबाशी इंदूबाईंची घट्ट नाळ जोडलेली पाहायला मिळते. इतकंच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांबद्दल त्या भरभरून बोलतात. उतारवयातही पवार कुटुंबातील सदस्य आपला सांभाळ करत आहेत. आपल्याकडेच राहावं असा आग्रह धरतात. पण आता मुलांनी तिकडे नेल्यामुळं इथं राहता येत नसल्याचंही इंदुबाई सांगतात.

इंदुबाई या पवार कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या अनेक आठवणी आवर्जून सांगतात. पवार कुटुंबातून मिळणाऱ्या मानाच्या स्थानाबद्दल त्या भरभरून बोलतात. आपण आहोत तोपर्यंत अजित पवारांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार याचा विवाह करावा अशीही इच्छा इंदुबाई व्यक्त करतात. अजित पवार आपली इच्छा पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांना वाटतो.

एकूणच पवार कुटुंबातील तीन पिढ्या पाहिलेल्या इंदुबाई झारगड यांना आजही या कुटुंबात मानाचं स्थान आहे. त्यामुळंच पवार कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग हा अनेकांचं लक्ष वेधणारा असतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI