कोरोनावरील लस सर्वात आधी कोणाला मिळणार? केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात…

देशातील नागरिकांना पुढील वर्षी जानेवारी महिन्यात कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते, असे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिले होते.

कोरोनावरील लस सर्वात आधी कोणाला मिळणार? केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात...
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 5:27 PM

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही देशांमधील नियंत्रणात आलेली कोरोनाची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांचे लक्ष कोरोनावरील लस कधी येणार याकडे लागले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Minister of Health Harsh Vardhan) यांनी रविवारी कोरोनावरील लसीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात देशातील नागरिकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले होते. त्यातच आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज कोरोनावरील लसीच्या वितरणाबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे. (Who will get the Corona Vaccine first in India; Health Minister Harsh Vardhan says…)

देशात सुरुवातीला 30 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. या 30 कोटी नागरिकांपैकी सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार याबाबत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सुरुवातीला एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील प्रभावी लस दिली जाईल. त्यानंतर दोन कोटी frontline workers ना कोरोनावरील लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 26 कोटी नागरिक आणि 50 वर्षांखालील एक कोटी नागरिक ज्यांना काही आजार आहेत, अशा एकूण 30 कोटी नागरिकांना पहिल्या टप्प्यात कोरोनावरील लस दिली जाईल.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन काल म्हणाले होते की, जानेवारी (2021) महिन्यात देशातील नागरिकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते. लसीची सुरक्षा आणि परिणामकारकतेला (प्रभावशीलता) आम्ही प्राधान्य देणार आहोत. याबाबत आम्हाला कोणतीही तडजोड करायची नाही. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, जानेवारी महिन्याच्या कोणत्याही आठवड्यात आपण भारतीय नागरिकांना पहिली कोरोना लस देण्याच्या स्थितीत येऊ शकतो.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) सध्या भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर या कंपन्यांनी केलेल्या विनंती अर्जांची तपासणी करत आहे. जेणेकरुन या कंपन्यांच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देता येईल. गेल्या आठवड्यात असे सांगण्यात आले होते की, DGCI ने या कंपन्यांकडून लसीबाबतचा अधिक डेटा मागितला आहे, ते खरे असले तरी त्याचा लस मिळण्याच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नाही.

भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर या कंपन्यांसह देशात इतर काही औषध कंपन्यांच्या लसींची चाचणी सुरु आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सध्या ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाची लस कोविशिल्डची (Covishield) चाचणी करत आहे. या लसीच्या चाचणीचा सध्या तिसरा टप्पा सुरु आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि आयसीएमआर निर्मित कोवॅक्सिन (Covaxin) लस तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या घेत आहे.

संबंधित बातम्या:

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती; केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, सरकार सतर्क, घाबरु नका

भारतात जानेवारीमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे संकेत

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा

भारतात जानेवारीमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे संकेत

(Who will get the Corona Vaccine first in India; Health Minister Harsh Vardhan says…)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.