आपल्या मुलांशी हेल्दी रिलेशनशिप डेव्हलप करण्याचे 4 मार्ग जाणून घ्या!

आयुष्यातील सर्वात महत्वाचे संबंध विश्वास आणि प्रेमावर आधारीत असतात. पालक आणि मुले यांच्यातील नाते अतूट असते आणि कोणत्याही भावनिक बंधनाच्या पलीकडचे असते. मुले आपल्या आई-वडिलांना नेहमी फाॅलो करत असतात. मुले त्यांच्या पालकांचा आधार घेतात आणि आपुलकी, प्रेम आणि संरक्षण मिळवतात.

आपल्या मुलांशी हेल्दी रिलेशनशिप डेव्हलप करण्याचे 4 मार्ग जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 9:28 AM

मुंबई : आयुष्यातील सर्वात महत्वाचे संबंध विश्वास आणि प्रेमावर आधारीत असतात. पालक आणि मुले यांच्यातील नाते अतूट असते आणि कोणत्याही भावनिक बंधनाच्या पलीकडचे असते. मुले आपल्या आई-वडिलांना नेहमी फाॅलो करत असतात. मुले त्यांच्या पालकांचा आधार घेतात आणि आपुलकी, प्रेम आणि संरक्षण मिळवतात. आपल्या मुलांशी नातेसंबंध दृढ करण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालवणे हे सर्वात महत्वाचे आहे.

प्रेम व्यक्त करा

आपण सहसा असे गृहीत धरतो की आपल्या मुलांना आपण किती प्रेम करतो हे माहित आहे. पण तसे नसते. कारण मुलांचे बोलण्यावर जास्त लक्ष असते. यामुळे आपल्या मुलांकडे नेहमी प्रेम व्यक्त करा.

मुलांशी संवाद साधा

तुम्ही तुमच्या मुलांशी चांगले संवाद साधता याची खात्री करा. ते अधिक अभिव्यक्त कसे होतील आणि संवाद आणि प्रामाणिकपणावर आधारित नातेसंबंध कसे बनवायचे ते त्यांना शिकवा. त्यांच्या भावना समजून घ्या. त्यांचा दृष्टिकोन ऐका आणि त्यांना गोष्टी कश्या आहेत हे समजवा.

सुरक्षित जागा तयार करा

पालक म्हणून, तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक सुरक्षित जागा तयार करणे आवश्यक आहे. ज्यात त्यांना सुरक्षित वाटेल आणि त्यांची काळजी घेतली जाईल. त्यांच्या गरजा ऐकल्या पाहिजेत.

रात्रीचे जेवण एकत्र करा

एक वेळापत्रक बनवा. ज्यात तुम्ही तुमच्या दिवसाचे किमान 30-60 मिनिटे तुमच्या मुलांसोबत घालवा. एकत्र जेवण हा तुमच्या मुलांसोबत राहण्याचा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. जेवणा दरम्यान चांगले कौटुंबिक संभाषण होऊ शकते. त्यांना त्यांचे मोबाईल दूर ठेवण्यास प्रोत्साहित करा आणि रिअल-टाइममध्ये कुटुंब म्हणून सामील व्हा.

मुलांना या गोष्टी कधीही बोलू नका

तु तुझ्या भावासारखा का नाहीस?- बऱ्याच वेळा आई-वडिल मुलांना म्हणतात की, तुझ्यापेक्षा तुझा लहान भाऊ\ बहिण हुशार आहे. तु का त्याच्यासारखा हुशार नाहीयेस. असे मुलांना बोलल्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कधीही मुलांना असे बोलू नये.

तुला सांगितलेली एकही गोष्ट करता येत नाही- जर तुम्ही तुमच्या मुलाला या गोष्टी पुन्हा पुन्हा बोलल्या की, तुला सांगितलेली एकही गोष्ट करता येत नाही. तर त्याच्या मनात अशी भावना येते की, ते काहीही करू शकत नाहीत.

तु जन्माला आला नसता तर बरे झाले असते- अनेकवेळा आई-वडिल मुलांनी काही चुका केल्या तर रागा-रागात म्हणतात की, तु जन्माला आला नसता तर बरे झाले असते. हे मुलांना बोलणे चुकीचे आहे. कारण यामुळे मुलांना अपराधी झाल्यासारखे वाटते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(4 Ways to Develop a Healthy Relationship with Kids)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.