99 टक्के लोकं चुकीच्या पद्धतीने खातात कांदा, जाणून घ्या कसे करावे सेवन

भारतात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कच्चा कांदा खायला देखील अनेकांना आवडतो. भारतात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होतं. पण अनेकांना कांदा खाण्याचे योग्य परिणाम माहित नसतात. कांद्याचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करु शकतात. कांदा कसा खालला पाहिजे जाणून घ्या.

99 टक्के लोकं चुकीच्या पद्धतीने खातात कांदा, जाणून घ्या कसे करावे सेवन
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 6:24 PM

कांद्याचा वापर विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कांदा केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर त्याच्या सेवनाने आरोग्यासाठी  अनेक फायदे देखील होतात. कांदा उष्माघातापासून देखील आपला बचाव करु शकतो. आहारतज्ञ सांगतात की, कांदा उष्णतेपासून दिलासा देतो. कांद्यामध्ये नैसर्गिक कूलिंग गुणधर्म असतात. यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूरअसते, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढतात. यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम देखील आढळतात, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात.

कांद्यात आढळणारे क्वेर्सेटिन आणि सल्फर हे घटक शरीराला थंडावा देतात. कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल आणि सल्फर संयुगे यांसारखी फायटोकेमिकल्स देखील आढळतात. हे घटक कांद्याचे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म वाढवतात.

शरीराला सामान्य तापमान राखण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव पडतो. कांद्यामध्ये असलेले एलिल सल्फाइड्स रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि रक्त परिसंचरण सुधारते.

कांदा पाचक एंझाइम सक्रिय करून पोटातील गॅस आणि अपचन सारख्या समस्यांपासून बचाव करतो. कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात. हे आपल्या आतड्यांमध्ये राहणाऱ्या चांगल्या जीवाणूंचे पोषण करतात आणि हे जीवाणू पचनासाठी आवश्यक असलेले लहान फॅटी ऍसिड तयार करतात.

कांद्यामध्ये आढळणारे क्रोमियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारात कांद्याचा समावेश जरूर करा. कांद्यामुळे लघवी तयार होण्याची प्रक्रिया वाढते. शरीरातील खराब पदार्थ सहज बाहेर काढता येतात.

कांद्याला लैंगिक इच्छा वाढवणारे अन्न देखील मानले जाते. हे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढविण्यात देखील मदत करतात. ज्यामुळे त्यांची लैंगिक क्षमता सुधारू शकते.

कांदा खाण्याची योग्य पद्धत

सलाडमध्ये कच्चा कांदा : कच्च्या कांद्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्ससह पोषक तत्वे आढळतात. हे शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. कच्च्या कांद्यामध्ये लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, मीठ आणि काळी मिरी घालून खाऊ शकता.

दह्यासोबत बनवलेला कांद्याचा रायता थंड आणि हायड्रेटिंग आहे. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. बारीक चिरलेला कांदा दह्यात मिसळा, चिमूटभर मीठ, जिरेपूड आणि चिरलेली कोथिंबीर घाला. थंड करून सर्व्ह करा.

अस्वीकरण: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Non Stop LIVE Update
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.