AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिट राहण्यासाठी मोड आलेले कडधान्य खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान

मोड आलेले कडधान्य हे पौष्टिकतेचे एक पावर हाऊस आहेत. ज्यामध्ये जीवनसत्त्वे अ, ब, क, ई, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असतात. त्यामुळे तुम्ही याचे योग्य पद्धतीने सेवन करणे फार महत्वाचे आहे. यासाठी मोड आलेले कडधान्य खाताना या गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे.

फिट राहण्यासाठी मोड आलेले कडधान्य खाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान
amazing health benefits of daily eat sprouts but right way otherwise problem know how to eat Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2025 | 7:59 PM
Share

प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करतात. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देत नाही यासाठी तंदुरस्त राहण्यासाठी काहीजण त्यांच्या आहारात मोड आलेले कडधान्य समाविष्ट करतात. तसेच आरोग्य तज्ञांच्या मते मोड आलेले कडधान्य हे पौष्टिकतेचे एक पावर हाऊस आहे. यांच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र हे मोड आलेले कडधान्य खाण्याची योग्य पद्धत माहित नसल्याने अनेकांना याच्या सेवनाचे फायदे मिळतच नाहीत. म्हणून तुम्हाला जर मोड आलेले कडधान्यांचे फायदे मिळवायचे असतील तर तुम्हाला खाण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की मोड आलेले कडधान्य खाण्याची योग्य पद्धत कोणती? यामध्ये कोणते पोषक घटक असतात? आणि हे खाण्याचे काय फायदे आहेत? चला तर मग जाणून घेऊयात…

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये या पोषक घटकांचा समावेश

आहारतज्ज्ञांच्या मते मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे एकूण आरोग्यासाठी आवश्यक मानले जातात. त्यात जीवनसत्त्वे अ, ब, क आणि ई सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे, तर त्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.

मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे?

आहारतज्ज्ञांच्या मते मोड आलेले कडधान्यांमधील पोषक घटक केवळ शरीराला बळकटी देत ​​नाहीत तर विविध अवयवांच्या कार्यातही योगदान देतात. तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याचबरोबर याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल देखील नियंत्रित करतात आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात मोड आलेले कडधान्यांचा समावेश करा. या कडधान्यांचे सेवन करून पोट आणि केसांशी संबंधित समस्या देखील दूर करू शकतात.

मोड आलेले कडधान्य खाण्याची योग्य पद्धत?

तज्ञांच्या मते, प्रत्येकाची मोड आलेले कडधान्य खाण्याची स्वतःची पद्धत असते. तथापि बहुतेक लोकांना ते कच्चे खायला आवडतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. अलिकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की कच्चे मोड आलेले कडधान्य खाणे हे एक धोकादायक आहे. कारण कच्चे मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते, म्हणून तुम्ही हे मोड आलेले कडधान्‍य शिजवुन खावे.

यासाठी मोड आलेले कडधान्य मिठाच्या पाण्यात 5 मिनिटे उकळवा आणि नंतर याचे सेवन करा.

एका पॅनमध्ये थोडे तेल घाला आणि ते गरम झाल्यावर त्यात मोड आलेले कडधान्य टाकून त्यात मीठ मिक्स करा. 5 मिनिटांनी गॅस बंद करा आणि त्याचे सेवन करा.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.