AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरडी आणि लालसर त्वचेच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी दररोज चेहऱ्याला लावा ‘या’ 3 गोष्टी

तुमच्या चेहऱ्यावर कोरडेपणा आणि लालसरपणाची समस्या सतावत असेल तर ही समस्या दुर करण्यासाठी तुम्ही हे सोपे घरगुती उपाय करून पाहू शकता.

कोरडी आणि लालसर त्वचेच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी दररोज चेहऱ्याला लावा 'या' 3 गोष्टी
skin care tips
| Updated on: Nov 02, 2025 | 2:53 PM
Share

बदलत्या वातावरणामुळे अनेकांना त्वचेच्या समस्या भेडसावत असतात. तसेच त्वचेची योग्य काळजी न घेतल्यानेही त्वचेचा समस्या निर्माण होतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर होतो. या निष्काळजीपणामुळे वेळोवेळी पुरळ, मुरुमे आणि विविध त्वचेच्या ॲलर्जी होत असते.

त्यात अधिकतर लोकांची त्वचा लालसर आणि कोरडी पडणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो आणि ही समस्या विशेषतः गाल आणि नाकाभोवती जास्त सतावत असते. तर आजच्या लेखात आपण काही सोपे आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जे तुम्हाला निरोगी, स्वच्छ, चमकदार आणि तेजस्वी त्वचा राखण्यास मदत करतील.

चेहऱ्यावर लालसरपणा का येतो?

चेहरावर लालसरपणा आणि कोरडेपणा येण्याची अनेक सामान्य कारणे आहेत. सर्वात सामान्य कारण म्हणजे तुमच्या त्वचेच्या टोननुसार योग्य प्रोडक्ट न निवडणे. शिवाय वारंवार चेहऱ्याला स्पर्श करणे आणि फेस वॉश व जास्त केमिकलचा वापर असलेल्या इतर ब्युटी प्रोडक्टचा वापर केल्याने चेहऱ्यावर ॲलर्जीची समस्या निर्माण होते. ज्यामुळे चेहरा लालसर आणि कोरडा होतो. तर या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी खालील उपायाचा अवलंब करा.

नारळ तेलाचा चेहऱ्यावर परिणाम दिसून येईल

नारळाचे तेल केवळ जळजळ होणाऱ्या त्वचेसाठीच नाही तर त्वचेच्या इतर अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. कोरड्या आणि लाल त्वचेपासून मुक्त होण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी गालावर व त्वचेवर नारळाचे तेल लावा. या उपायाचा नियमित वापर केल्याने आठवड्यातून तुमची ॲलर्जी कमी होण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नारळाच्या तेलाऐवजी तीळाचे तेल देखील वापरू शकता.

चेहऱ्यावर ग्लिसरीन लावा

चेहऱ्याची त्वचा खूपच नाजूक असते आणि जेव्हा त्वचेवर केमिकलचा अधिक वापर असलेल्या ब्यूटी प्रोडक्टचा वापर चेहऱ्यावर केल्याने त्वचा लवकर कोरडी आणि निर्जीव होऊ शकते . ग्लिसरीन हे नाजूक त्वचेसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे, कारण ते केवळ त्वचेला बरे करत नाही तर ओलावा टिकवून ठेवण्यास देखील मदत करते. तथापि, ग्लिसरीन थेट त्वचेवर लावू नका याची काळजी घ्या. ग्लिसरीन लावताना नेहमी गुलाबपाणी किंवा नारळाच्या तेलात मिक्स करून ते चेहऱ्यावर लावा.

जेल-बेस्ड मॉइश्चरायझर लावा

बऱ्याचदा आपण आपल्या त्वचेचा प्रकार योग्यरित्या ओळखत नाही, म्हणूनच बहुतेक लोक फोमिंग क्लींजरचा वापर करतात. पण जेव्हा या क्लींजरचा वापर करतो तेव्हा त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघून जातो, ज्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते. म्हणूनच तुमच्या त्वचेचे कोरडेपणापासून संरक्षण करण्यासाठी आणि त्वचेला पोषण मिळावे यासाठी जेल-बेस्ड मॉइश्चरायझर किंवा क्लींजर वापरणे आवश्यक आहे. जेल-बेस्ड उत्पादने कोरडेपणा टाळतात आणि आवश्यक आर्द्रता प्रदान करून त्वचेला पोषण देतात.

या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावर विशेषतः गालावर आणि नाकाभोवतीच्या भागात बऱ्याच दिवसांपासून लालसरपणा आणि कोरडेपणा जाणवत असेल तर कोणताही विलंब न करता ताबडतोब त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

यासोबतच तुमच्या चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका आणि चेहऱ्यावर नखांचा स्पर्श होऊ देऊ नका याची विशेष काळजी घ्या, कारण असे केल्याने त्वचेची ही समस्या आणखी वाढू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.