तुमच्या स्किन टोननुसार लावा ‘हे’ 4 घरगुती फेसपॅक, खुलवतील चेहऱ्यावरचं सौंदर्य
त्वचेची काळजी नेहमी त्वचेच्या टोननुसार घ्यावी. तेलकट त्वचेसाठी सेबम नियंत्रित करणाऱ्या गोष्टी वापरल्या पाहिजेत, तर कोरड्या त्वचेवर हायड्रेट करणाऱ्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. या लेखात आपण त्वचेच्या टोननुसार चार प्रकारच्या फेस पॅकबद्दल जाणून घेऊयात...

आजच्या बदलत्या जीवनशैलीत व बदलत्या वातावरणात आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. तर स्किन केअर करताना नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे त्वचेसाठी नेहमी चांगले असते, कारण तज्ञ असेही म्हणतात की नैसर्गिक गोष्टींच्या वापराने त्वचेला त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. कोरफड, हळद, मध, नारळाचे तेल, गुलाबपाणी यासारख्या नैसर्गिक गोष्टी तुमच्या त्वचेला खोलवर पोषण देतात. या सर्व गोष्टींचे वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि तुम्ही जेव्हा या गोष्टी त्वचेवर लावता तेव्हा त्याचे अनेक फायदे होत असतात. ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी होते. त्वचेला मॉइश्चरायझ करण्यापासून ते स्क्रब करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी नैसर्गिक गोष्टी उपलब्ध आहेत. तर आजच्या या लेखात आपण स्किन टोननुसार चार वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक फेस पॅक कसे तयार करायचे आणि ते कसे लावायचे याबद्दल जाणून घेऊयात.
कोरड्या त्वचेपासून ते तेलकट त्वचेपर्यंत प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या गरजा वेगवेगळ्या असतात. कोरड्या त्वचेला ज्याप्रमाणे ओलावा हवा असतो, त्याचप्रमाणे तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळावी यासाठी त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकणे. म्हणून तुम्ही तुमच्या त्वचेवर काय लावायचे हे ठरवण्यापूर्वी तुमची स्किन टोन लक्षात ठेवा. त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेवर नैसर्गिक चमक मिळवायासाठी या घरगुती फेस पॅकबद्दल जाणून घेऊयात.
सामान्य त्वचेसाठी फेस पॅक
ज्या लोकांची त्वचा जास्त तेलकट किंवा जास्त कोरडी नसते त्यांची स्किन टोन सामान्य असते. जर तुमची त्वचाही अशी असेल तर स्किन केअर करण्यात कोणतीही फारशी अडचण येत नाही. अशा त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी मधात चिमूटभर हळद आणि कच्चे दूध मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. अशाने तुम्हाला तुमची त्वचा चमकदार दिसेल.
कोरड्या त्वचेसाठी फेस पॅक
जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर ती मऊ करण्यासाठी ताजी दुधाची मलई घ्या आणि दोन ते तीन बारीक पुड केलेले बदाम त्यात टाकून त्यांची पेस्ट बनवा. बदाम हे व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत आहे. त्यात चिमूटभर हळद देखील मिक्स करा. हा पॅक 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
तेलकट त्वचेसाठी फेस पॅक
जर फेस वॉश केल्यानंतर लगेचच चेहऱ्यावर तेल येऊ लागले तर ती त्वचा तेलकट आहे. त्वचेवरील तेल काढून टाकण्यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर, कडुलिंबाच्या पानांची पावडर, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून फेस पॅक बनवा. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ करा, यामुळे अतिरिक्त तेल कमी होईल आणि मुरुमांची समस्या देखील कमी होऊ लागतील.
मिश्र त्वचेसाठी फेस पॅक
ज्या लोकांच्या चेहऱ्याच्या काही भागांवर तेल असते जसे की टिन झोन, गालाभोवती आणि उर्वरित त्वचा कोरडी दिसते, अशा त्वचेला मिश्र स्किन टोन म्हणतात. जर तुमच्या त्वचेचा हा प्रकार असेल तर काकडीचा रस काढून त्यात दही, मध आणि चिमूटभर हळद मिक्स करून पॅक बनवा. ते तुमच्या चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा आणि नंतर चेहरा स्वच्छ करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
