कोरोनाच्या काळात आहारात मीठ, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळाच !

सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे झाले आहे. या काळात आरोग्याबद्दलचा थोडासा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो.

कोरोनाच्या काळात आहारात मीठ, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळाच !

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे झाले आहे. या काळात आरोग्याबद्दलचा थोडासा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो. विशेषतः या काळात आपण आहारात काय खातो हे अतिशय महत्वाचे आहे. कारण त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देत आहे. (Avoid salty, oily and spicy foods in your diet during corona)

याच दरम्यान जर आपण आहारात मीठ, तेलकट आणि मसालेदार पदार्थ जास्त घेतले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. जर तुम्हाला जेवणात अधिक मीठ खाणे आवडत असेल, तर या आवडीला वेळीच बंधने घातली पाहिजेत. आरोग्याला होणारे धोके लक्षात घेतल्यानंतरही जर आपली ही सवय सुटत नसेल, तर मिठाला पर्याय म्हणून आपण इतर घटक वापरू शकता. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, अधिक प्रमाणात मीठ कर्करोगासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते.

मीठामध्ये सोडिअम असते, जे आपल्या शरीराला आवश्यक असते. पण त्याचे अधिक सेवन हृदयासाठी घातक ठरु शकते. मिठातले सोडिअम शरीरातील पाणी शोषते. त्यामुळे आहारात मीठ जास्त असेल तर डी-हायड्रेशन त्रास होऊ शकतो. म्हणून उच्च रक्तदाबाचा विकार असलेल्यांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. सैंधव किंवा शेंदेलोण हा मिठाला पर्याय होऊ शकत नाही. मसालेदार पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरुम देखील येतो. ते पाचन प्रक्रियेवर देखील परिणाम करतात. म्हणूनच, आपण मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.

‘या’ गोष्टींपासून राहा दूर

– सिगारेट, अल्कोहोल किंवा इतर कोणतेही मादक पदार्थ पूर्णपणे टाळा.

– फॅटी लिव्हरच्या रूग्णांनी जास्त प्रमाणात मीठ खाणे देखील चांगले नाही. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने शरीरात जास्त पाणी साठते, जे फॅटी लिव्हरच्या रूग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.

– फॅटी लिव्हर रुग्णांनी गोड गोष्टी जास्त खाऊ नयेत. टॉफी, चॉकलेट, फळांचा कृत्रिम रस, सोडा इत्यादी पदार्थ टाळा.

– फॅटी लिव्हरच्या रूग्णांनी पांढर्‍या ब्रेडचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच हे पचविणे देखील थोडे कठीण आहे.

– जर आपण फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आपण लाल मांस खाऊ नये. यात संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आपली समस्या वाढू शकते.

– तेलात अधिक चरबी आणि कॅलरीज असतात म्हणून फॅटी लिव्हर रुग्णांनी तेलकट, तळलेले आणि जंक फूड खाऊ नये.

संबंधित बातम्या : 

(Avoid salty, oily and spicy foods in your diet during corona)