Skin Care | नितळ कांती हवीय ? मग दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला कच्चे दूध लावा

हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. तुमची त्वचा खूप कोरडे होते. परंतु हे अगदी सामान्य आहे. कारण ऋतूनुसार सर्वकाही बदलते. या हंगामात एपिडर्मिसचा बाह्य थर सोलायला लागतो. ज्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. त्वचेला खाज सुटते.

Skin Care | नितळ कांती हवीय ? मग दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला कच्चे दूध लावा
त्वचेची काळजी

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. तुमची त्वचा खूप कोरडी होते. परंतु हे अगदी सामान्य आहे. कारण ऋतूनुसार सर्वकाही बदलते. या हंगामात एपिडर्मिसचा बाह्य थर सोलायला लागतो. ज्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. त्वचेला खाज सुटते. यामुळेच या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमके काय करावे असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातही तजेलदार त्वचा ठेवण्यासाठी एक खास आणि सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. यासाठी आपल्याला फक्त दूध लागणार आहे. चार ते पाच चमचे दूध घ्या आणि रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. दूध चेहऱ्याला लावल्यानंतर सरळ सकाळीच आपला चेहरा धुवा.

दूध आपल्या चेहऱ्याला मऊ करण्याचे काम करते. यामुळे आपला चेहरा तजेलदार राहतो. मात्र, त्वचेला दूध लावताना हे नेहमी लक्षात ठेवा की, दूध हे कच्चे असावे. कच्चे दूध त्वचेसाठी फायदेशीर आहे. यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. जर तुम्ही हलक्या हाताने गोलाकार हालचालीत कच्चे दूध लावले आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ केला तर त्वचा चमकदार बनते. जर त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर पुरळ येणे सामान्य मानले जाते.

मुरुमावर रात्री कच्चे दूध लावल्यास तेलकट त्वचेची समस्या दूर होते. कच्च्या दुधात ब जीवनसत्त्वे, कॅल्शियम, अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे काळे डाग आणि पॅच साफ करण्यास मदत करते. टॅनिंग, मुरुमांवर उपचार करते आणि सुरकुत्या, त्वचेचे नुकसान आणि बारीक रेषा कमी करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI