पावसाळ्याच्या हंगामात तेलकट केसांमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करा!

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत केवळ त्वचाच नाही तर केसही जास्त प्रमाणात चिकट होतात. ज्यामुळे केस खूप तेलकट आणि चिकट दिसण्यास सुरूवात होते.

पावसाळ्याच्या हंगामात तेलकट केसांमुळे त्रस्त आहात? मग 'हे' घरगुती उपाय करा!
पावसाळ्यात केसांची काळजी

मुंबई : पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत केवळ त्वचाच नाही तर केसही जास्त प्रमाणात चिकट होतात. ज्यामुळे केस खूप तेलकट आणि चिकट दिसण्यास सुरूवात होते. लांब केसांमुळे, मुलींना दररोज आपले केस धुणे शक्य होत नाही. चिकट केसांमुळे आपला लूकही खराब दिसतो. आपण काही टिप्स फाॅलो करून चिकट आणि तेलकट केसांची समस्या दूर करू शकतो. (Take these measures to eliminate the problem of oily hair during the rainy season)

1. केसांमध्ये जास्त शैम्पू केल्यामुळे केस कोरडे पडतात आणि ब्रेक होऊ लागतात. अशा परिस्थितीत ड्राई शैम्पू आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. आपण आठवड्यातून फक्त दोनदा आपले केस धुवा आणि जर आपल्याला केस तेलकट किंवा चिकट वाटले तर ड्राई शैम्पू आपले केस धुवा.

2. जर आपण व्यायाम करत असाल तर व्यायाम करण्याच्या अगोदर केसांना चुकूनही तेल लावू नका. यामुळे जास्त घाम फुटतो आणि आपले केस त्वरीत चिकट होतात.

3. जर आपले केस खूप जास्त तेलकट होत असतील तर आपण केस कंडिशनरने धुतले पाहिजेत. केसांचा तेलकटपणा दूर करण्यासाठी कंडिशनर फायदेशीर असते.

4. तेलकट केस दिसण्यासाठी चांगले दिसत नाहीत तर तेलकट केसांमुळे आपल्या डोक्यामध्ये कोंडा होण्याची देखील शक्यता असते. अशा परिस्थितीत दोन चमचे नारळाच्या तेलामध्ये एक चमचे लिंबाचा रस मिसळा आणि केसांवर लावा. यामुळे तेलकट केसांची समस्या दूर होईल.

5. आपल्या केसांच्या प्रकारानुसार केसांची उत्पादने वापरा. तसेच, आपली केसांची उत्पादने सिलिकॉन मुक्त असल्याची खात्री करा.

6. हीटिंग टूल्सचा वापर टाळा कारण ते निश्चितपणे आपल्या केसांना स्टाइलिश बनविण्यात मदत करतात, परंतु ते केसांना तेलकट आणि चिकट बनवतात.

7. तेलकट केसांची समस्या दूर करण्यासाटी केसांसाठी तुम्ही कोरफडही वापरू शकता. कोरफडीमुळे केसांचा तेलकटपणा जाण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Take these measures to eliminate the problem of oily hair during the rainy season)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI