Homemade Bleach: त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ नैसर्गिक ब्लीच वापरून त्वचा चमकदार बनवा!

त्वचा स्वच्छ करण्यासाठी ब्लीच खूप चांगले मानले जाते. पण प्रत्येकाची त्वचा सारखी नसते. काही लोकांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. त्याच वेळी, बाजारात उपस्थित ब्लीचमध्ये अमोनिया असतो. होममेड ब्लीचमुळे तुमची त्वचा चमकते, तसेच दुष्परिणामांचा धोकाही नाही. घरी ब्लीच कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

Homemade Bleach: त्वचा निस्तेज झाली आहे? मग 'हे' नैसर्गिक ब्लीच वापरून त्वचा चमकदार बनवा!
त्वचा

मुंबई : त्वचा स्वच्छ करण्यासाठी ब्लीच खूप चांगले मानले जाते. पण प्रत्येकाची त्वचा सारखी नसते. काही लोकांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. त्याच वेळी, बाजारात उपस्थित ब्लीचमध्ये अमोनिया असतो. त्यामुळे ते प्रत्येकाला सुट होत नाही. अनेक लोकांना ब्लीच केल्यानंतर चेहऱ्यावर पुरळ, रॅशेस वगैरे येतात.

जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही घरगुती ब्लीच वापरून पाहू शकता. होममेड ब्लीचमुळे तुमची त्वचा चमकते, तसेच दुष्परिणामांचा धोकाही नाही. घरी ब्लीच कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

होममेड ब्लीच कसा बनवायचा

गुलाब पाणी – एक चमचे

हळद पावडर – एक चमचा

चंदन पावडर – 1/4 टीस्पून

लिंबाचा रस – अर्धा चमचा

कसे बनवायचे ते शिका

एक वाडगा घ्या आणि त्यात हळद, चंदन पावडर, लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळा. ते चांगले मिसळा आणि सुमारे 10 मिनिटे सोडा. त्यानंतर त्याचा वापर करा. जर चंदन पावडर उपलब्ध नसेल तर बेसनाचा वापर केला जाऊ शकतो आणि लिंबाच्या जागी टोमॅटोचा रस वापरला जाऊ शकतो.

वापरण्याची पध्दत

घरगुती ब्लीच वापरण्यापूर्वी, तोंड आणि मान पाण्याने चांगली धुवा. जेणेकरून चेहऱ्यावर साचलेले धूळ आणि मातीचे कण सहज काढले जातील. यानंतर, ब्रशच्या मदतीने पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. डोळ्यांच्या सभोवताली जास्त लावणे टाळाच. 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर पॅक तसाच राहूद्या. त्यानंतर काही वेळ चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यानंतर चेहरा टॉवेलने हलक्या हाताने पुसा.

कोरफड जेल लावा

तोंड धुल्यानंतर कोरफड जेल आणि गुलाबपाणी चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हे आपला चेहरा थंड करण्याचे काम करते. अशा प्रकारे, आपण आठवड्यातून एकदा हे नैसर्गिक ब्लीच वापरू शकता. काही वेळातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूप फरक दिसेल.

हे देखील लक्षात ठेवा

हे ब्लीच एकदा किंवा दोनदा वापरल्याने जर त्वचेवर खाज आणि पुरळ येत असेल तर हे ब्लीच कधीच पुन्हा वापरू नका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संंबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This Homemade Bleach is extremely beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI