Skin care : चेहरा धुण्यासाठी फेसवॉशऐवजी वापरा ‘ह्या’ गोष्टी, त्वचेला मिळतील अनेक फायदे

face washing tips: स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील पदार्थ चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरता येतात. बेसनाचा वापर करून चेहरा स्वच्छ धुतल्यास अनेक फायदे मिळतात. त्वचा चमकदार होतेच पण त्यावरील टॅनिंगही कमी होते.

Skin care : चेहरा धुण्यासाठी फेसवॉशऐवजी वापरा 'ह्या' गोष्टी, त्वचेला मिळतील अनेक फायदे
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 2:59 PM

चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, त्यापैकीच एक उपाय म्हणजे फेसवॉशचा (face wash)वापर करणे. रोजच्या रोज त्वचेची स्वच्छ काळजी घेणे अतिशय गरज आहे, त्यात एक दिवसही खंड पडल्यास पिंपल्सचा (Pimples problem) त्रास होऊ शकतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश तसेच क्लींजरचा वापर करता येतो. बाजारात अनेक फेसवॉश उपलब्ध आहेत, पण त्यातील हानिकारक घटकांमुळे चेहऱ्याच्या त्वचेला त्रासही होऊ शकतो. मात्र घरात उपलब्ध असलेल्या काही घटकांचा वापर करून चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा चमकदार होतेच पण स्किन प्रॉब्लेम्सही (skin problems)कमी होतात. त्यापैकीच एक घटक म्हणजेच बेसन,अर्थात चणाडाळीचे पीठ. त्याच्या योग्य वापरामुळे त्वचेला खूप फायदे मिळतात.

असा बनवा बेसन फेसवॉश

एका वाटीत तीन ते चार चमचे बेसन घ्या. त्यामध्ये थोडेसे दूध घालून चांगली पेस्ट तयार करा. ते मिश्रण चेहऱ्याला लावून हळूवारपणे मसाज करा. चेहरा तसेच मानेवरही हे मिश्रण व्यवस्थित लावा. थोड्या वेळाने हे मिश्रण वाळल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून हळुवारपणे टिपून घ्या. हा उपाय रोजच्या रोज केला तर उत्तमच, अन्यथा आठवड्यातून तीन वेळा तरी हा उपाय केल्यास अपेक्षित परिणाम दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

टॅनिंग होईल दूर

स्किन केअरसाठी बेसन खूप उपयोगी मानले जाते. आपली आजी-आईही त्वचेसाठी बेसन वापरायच्या. त्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील टॅनिंग (काळेपणा) कमी होतो, तसेच त्वचेचा रंगही उजळतो. प्रदूषण, धूळ, माती, कडक ऊन या सर्वांचा परिणाम होऊन त्वचा रापते, तिचा रंग काळवंडतो. या सर्वांवर बेसन हा उत्तम उपाय आहे. त्यातील गुणधर्मांमुळे मृत पेशी निघून जाण्यास मदत होते आणि त्वचा उजळते.

त्वचेवरील डाग कमी होतील

त्वचेवरी पिंपल्सचा त्रास सर्वांनाच होतो. खाण्या-पिण्याच्या सवयी, धूळ, प्रदूषण यामुळ त्वचेचा पोत बिघडतोच. त्यातून पिंपल्स आणि काळ्या डागांचा त्रासही वाढतो. मात्र बेसनाचा नियमित वापर करून चेहरा स्वच्छ धुतल्यास काळे डाग कमी होतात. पिंपल्सही कमी होण्यास मदत होते. मात्र बेसनाचा फेसपॅक धुतल्यानंतर त्वचेला मॉयश्चरायझर लावणे विसरू नका. तसेच ताजे , सकस अन्न, पुरेशी झोप, थोडाफार व्यायाम, डोळ्यांना ताण पडेल अशा मोबाईल- लॅपटॉपचा वापर मर्यादित केल्यानेही आपले शरीर आणि त्वचा निरोगी राहते.

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.