Skin Care : तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘हा’ फेस मास्क वापरून पाहा!

तेलकट त्वचा असलेल्या लोकांना पावसाळ्यात अधिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या हंगामात चेहरा चिकट दिसतो. पावसाळ्यात जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते. या हंगामात सेबमचे जास्त उत्पादन झाल्यामुळे मुरुम येतो.

Skin Care : तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असाल तर 'हा' फेस मास्क वापरून पाहा!
त्वचेची काळजी

मुंबई : तेलकट त्वचा असलेल्या लोकांना पावसाळ्यात अधिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या हंगामात चेहरा चिकट दिसतो. पावसाळ्यात जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते. या हंगामात सेबमचे जास्त उत्पादन झाल्यामुळे मुरुम येतो. बऱ्याच वेळा त्वचेची काळजी घेऊनही त्वचा तेलकट होते. (Use this face mask if you are suffering from oily skin problem)

तेलकट त्वचेमुळे त्वचा निस्तेज, थकलेली आणि स्निग्ध दिसते. जर तुम्हीही तेलकट त्वचेमुळे होणाऱ्या समस्यांनी त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती फेसमास्क मास्क घेऊन आलो आहोत. हे फेस मास्क लावल्याने त्वचा ताजी आणि चमकदार दिसते.

टोमॅटो आणि बेसन

हा मास्क तयार करण्यासाठी टोमॅटो अर्धा कापून त्याचा रस बनवा. आता रसामध्ये एक वाटी बेसन घाला आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटे सोडा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

ओटमील आणि अंडी

हा मास्क तयार करण्यासाठी, अर्धा कप शिजवलेल्या ओट्समध्ये एक अंडे मिसळा आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण बनवण्यासाठी सर्व गोष्टी नीट मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.

केळी आणि लिंबाचा रस

तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी केळीचा वापर करा. यासाठी केळ्यामध्ये थोडा लिंबाचा रस, एक चमचा तेल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे सोडा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

लिंबू आणि दही फेसपॅक

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे त्वचेच्या तेलावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. दहीमध्ये लैक्टिक अॅसिड असते. हे नैसर्गिक शुद्धीकरणासारखे कार्य करते. हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे दही 2 चमचे लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण त्वचेवर लावा आणि 5-10 मिनिटे सोडा. यानंतर कोमट पाण्याने धुवून तेल मुक्त मॉइश्चरायझर लावा. हा मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Use this face mask if you are suffering from oily skin problem)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI