वाढलेले वजन कमी करण्यासाठी काळी मिरी अत्यंत फायदेशीर, वाचा !

काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. काळी मिरी खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी काळी मिरी अत्यंत फायदेशीर, वाचा !
काळी मिरी
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 10:23 AM

मुंबई : काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. काळी मिरी खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटक देखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह काळीमिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. (Pepper is extremely beneficial for weight loss)

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. यामुळे अनेकांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जात आहेत. मात्र, म्हणावे तसे वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी काळी मिरी अत्यंत फायदेशीर आहे. आपण आहारात जास्तीत-जास्त काळी मिरीचा समावेश केला पाहिजे. खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.

सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते. त्यातील पोषकद्रव्ये आपली भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात. यामुळे खाद्यपदार्थांमध्ये हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीचा वापर केला पाहिजे.

काळी मिरीमध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल. फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यास आपण काळीमिरी आणि पुदीना युक्त चहा पिऊ शकता.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Black pepper is extremely beneficial for weight loss)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.