कुलर गरम हवा देतोय? ही 5 रुपयांची ट्रिक वापरा आणि मिळवा एसीसारखी थंडी
घरात एसी नसलं तरी चिंता करण्याचं कारण नाही. आता पावसाळ्यात फक्त हे छोटेसे घरगुती उपाय केल्यास, तुमचा साधा कूलरही एसीसारखा काम करेल.

पावसाळ्यात हवामानात प्रचंड आर्द्रता असते. घरात थोडेसेही बंद वातावरण असेल, तर घाम, चिपचिपाट आणि उष्मा त्रासदायक होतो. अशा वेळी ज्यांच्याकडे एसी नाही, त्यांच्यासाठी कूलर एकमेव पर्याय ठरतो. पण आश्चर्य म्हणजे, अनेकदा कूलर चालू करूनसुद्धा हवा गरम आणि दमट वाटते! खरंतर, कूलर थंड हवा देतोच, पण पावसाळ्यात वातावरणात नमी वाढते आणि यामुळे कूलरची हवा चिपचिपीत वाटते. या समस्येवर आता एक छोटा पण प्रभावी उपाय सापडला आहे आणि तोही फक्त 5 रुपयांमध्ये.
बेकिंग सोडा
घरात सहज उपलब्ध होणारा बेकिंग सोडा केवळ स्वयंपाकातच नाही, तर पावसाळ्यातील हवेतील ओलावा कमी करण्यासाठीही वापरता येतो. यासाठी फक्त थोडासा बेकिंग सोडा घ्या, तो एका स्वच्छ सुती कापडात बांधून छोटीशी पोटली तयार करा. ही पोटली तुम्ही खोलीच्या कोपऱ्यात लटकवा. जेव्हा कूलर चालू असेल, तेव्हा बेकिंग सोडा हळूहळू हवेतून आर्द्रता शोषून घेतो आणि खोलीतील नमी कमी होते. त्यामुळे हवा अधिक थंड वाटते आणि चिपचिपाटही कमी होतो. हा उपाय अत्यंत स्वस्त असून, फक्त पाच रुपयांमध्ये बेकिंग सोडा मिळतो!
पंखा आणि कूलर एकत्र वापरा
अनेकांना वाटतं की, कूलर वापरत असताना पंखा बंद केला पाहिजे. पण प्रत्यक्षात, पावसाळ्यात पंखा आणि कूलर दोन्ही एकत्र चालवले तर अधिक फायदेशीर ठरतात. पंखा हवेला बाहेर ढकलतो, ज्यामुळे घरात अडकलेली दमट हवा बाहेर जाते आणि खोली थंड व हवेशीर राहते.
खिडक्या उघडून ठेवा
तुमच्या घरात एग्जॉस्ट फॅन असेल, तर तो चालू करा आणि जवळची एखादी खिडकी थोडीशी उघडी ठेवा. यामुळे बाहेरची ताजी हवा आत येते आणि खोलीतील नमी बाहेर निघून जाते. ही एक सोपी आणि नैसर्गिक वेंटिलेशन पद्धत आहे.
पाणी न घालता कूलर चालवा
जर नमी खूप जास्त वाटत असेल, तर काही वेळेस कूलरमध्ये पाणी न घालता तो चालवा. यामुळे सर्क्युलेशन राहते आणि हवा थोडी थंड वाटू लागते. हा उपाय तात्पुरता असला तरी दमटपणा टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
