दुसऱ्यांच्या या गोष्टी अजिबात वापरू नका, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू झालेच म्हणून समजा

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कोणाच्या वस्तू वापरत असाल तर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे इतरांच्या वस्तू वापरल्यास त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. त्यामुळे शक्यतो इतरांच्या वस्तू वापरणे टाळावे. जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार इतरांच्या कोणत्या वस्तू वापरणे निश्चित आहे.

दुसऱ्यांच्या या गोष्टी अजिबात वापरू नका, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू झालेच म्हणून समजा
दुसऱ्यांच्या या गोष्टी अजिबात वापरू नकाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 2:02 PM

हिंदू धर्मात वास्तुशास्त्र केवळ दिशानिर्देशनाचे महत्त्व सांगत नाही तर एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील नियमानबद्दल देखील सांगते. आपल्या समाजात अनेकांना अशी सवय असते की ते इतरांकडून वस्तू घेतात आणि त्या वापरतात. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अशा प्रकारे इतरांच्या वस्तू घेणे आणि देणे अशुभ मानले जाते. जे लोक इतरांकडून वस्तू घेतात आणि स्वतः वापरतात त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. माणसाच्या आत नकारात्मक ऊर्जा प्रवेश केल्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा काही लोक एकमेकांच्या वस्तूंची देवाण-घेवाण करतात. तेव्हा एकमेकांची ऊर्जा देखील त्यांच्यामध्ये प्रवेश करते. या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला अनेक नवीन समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवाण-घेवाण करणे टाळल्या पाहिजे ते जाणून घेऊ.

दागिन्यांची देवाण-घेवाण

पूजा, धार्मिक कार्यक्रम, लग्न या समारंभामध्ये अनेक महिला त्यांच्या कपड्यांची जुळणारे दागिने घालतात. मात्र ते आपल्याकडे नसल्यास दुसरे कोणाचे तरी घेऊन ते घालतात. वास्तुशास्त्रात दुसऱ्याचे दागिने घेऊन ते घालणे निशिद्ध मानले गेले आहे. याचा ग्रहांवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे परिधान करणाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

मीठ

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर मीठ कधीही कोणाला देऊ नये किंवा कोणाकडून ते घेऊ नये. वास्तुशास्त्रानुसार कोणाला मीठ दिल्यास घरातून सुख-समृद्धी निघून जाते.

बूट चप्पल बदलणे

वास्तुशास्त्रात बूट आणि चप्पल यांची देवाण-घेवाण करणे अशुभ मानले जाते. दुसऱ्याचे बूट किंवा चप्पल कधीही घालू नये. जे लोक दुसऱ्याचे बूट आणि चप्पल घालतात त्यांच्या आयुष्यात गरिबी येते. तसेच इतरांची नकारात्मक ऊर्जा देखील स्वतःमध्ये शोषली जाते.

कंगवा

अनेक जण इतरांनी वापरलेला कंगवा वापरतात. पण या सवयीमुळे आरोग्याला नुकसान होतेच पण त्यासोबतच ती वस्तू असणाऱ्याची नकारात्मक ऊर्जा येते.

पेन आणि पुस्तकाची देवाणघेवाण

पुस्तक आणि पेन यातून ज्ञान मिळते. वास्तुशास्त्रानुसार कधीही पुस्तक कोणाला देऊ नये. पुस्तक दिल्याने ज्ञान मिळवण्यास अडथळे निर्माण होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.