AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Staircase Workout Tips : घरच्या घरी करा हे तीन वर्कआऊट्स, जिमला जाण्याची आवश्यकता नाही

पायर्‍या चढणे केवळ आपल्या पायांच्या स्नायूंनाच बळकटी देत नाही तर त्यामध्ये रक्त सर्कुलेशनदेखील वाढवते. (Do these three workouts at home, no need to go to the gym)

Staircase Workout Tips : घरच्या घरी करा हे तीन वर्कआऊट्स, जिमला जाण्याची आवश्यकता नाही
वर्कआऊट्
| Edited By: | Updated on: Mar 17, 2021 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली : गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे लोक घराबाहेर पडताना कोणतीही रिस्क पत्करत नाहीत. अनलॉकनंतर लोक कामधंद्यानिमित्त घराबाहेर पडत असले तरी बरेच लोक अजूनही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. त्यातील एक ठिकाण म्हणजे जिम आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जर तुम्ही जिममध्ये जात नसाल, तर आज आम्ही तुम्हाला असे काही व्यायाम सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच चांगली प्रॅक्टिस करू शकाल. आपल्या घराबाहेर पायर्‍या असतील. आपण जिममध्ये न जात या पायर्‍यावर वर्कआउट करू शकता. आपणास हे माहित हवे कि घराबाहेरील पायर्‍या आपल्या दैनंदिन वर्कआउट्सचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतात. पायर्‍या चढणे केवळ आपल्या पायांच्या स्नायूंनाच बळकटी देत नाही तर त्यामध्ये रक्त सर्कुलेशनदेखील वाढवते. (Do these three workouts at home, no need to go to the gym)

स्टीयर स्प्रिंट

जर तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त वजन कमी करायचा प्रयत्न करीत असाल तर स्टीयर स्प्रिंट व्यायाम आपल्यासाठी योग्य आहे. सर्वात सोपा परंतु तरीही सर्वात कठीण व्यायाम आहे. स्टीयर स्प्रिंट आपल्या शरीराच्या अनेक स्नायूंचा वापर करते. हा व्यायाम क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग आणि स्नायूंना बळकटी देते. यासाठी आपल्याला पायऱ्यांच्या तळापासून प्रारंभ करुन वरच्या भागापर्यंत धाव घ्यावी लागेल. जेव्हा तुम्ही वरच्या स्थानी पोहोचता, तेव्हा तेथून मागे वळा आणि परत खाली पळायला सुरवात करा. हे काही काळ करत रहा.

स्टीयर लंजेज

या व्यायामासाठी आपल्याला पायऱ्यांकडे तोंड करावे लागेल. आपला उजवा पाय पायरीच्या वर ठेवावा लागेल, तर आपला डावा पाय मागील बाजूस ठेवा आणि योग्य संतुलन साधत खाली वाका. आपले दोन्ही हात कंबरेवर ठेवून जोराने श्वास घ्या. त्यांनतर खाली वाकून श्वास सोडा. खाली वाकताना आपला डावा पाय सरळ आहे आणि गुडघे वाकलेले नाहीत याची खात्री करा. दोन्ही पायांनी हा व्यायाम 12 वेळा करा.

स्टीयर डीप

आपल्या हाताच्या वरच्या भागाला टोन देण्यासाठी स्टीयर डीपपेक्षा दुसरा कुठला सर्वोत्तम पर्याय नाही. पायऱ्यांवर पुन्हा उभे रहा आणि त्यानंतर वाकताना दोन्ही हात पायरीवर ठेवा. आपले पाय सरळ आणि गुडघे जमिनीवर ठेवा. आता पुन्हा एकदा कोपर खाली वाकवून परत खाली जा. हा व्यायाम 30 सेकंदासाठी करा. एकूण तीन सेट म्हणजे तीन वेळा हा व्यायाम करा. (Do these three workouts at home, no need to go to the gym)

इतर बातम्या

स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान खेळाडूचा मृत्यू; फोटोंमधून पाहा धोकादायक खेळ

India vs England 3Rd T20I | कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह शानदार कामगिरी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.