रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गाजराचा रस प्या, वाचा याबद्दल अधिक !

कोरोनापासून दूर राहिचे तर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गाजराचा रस प्या, वाचा याबद्दल अधिक !
गाजराचा रस

मुंबई : कोरोनापासून दूर राहिचे असेलतर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली करण्यासाठी आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. त्यामुळे गाजर खाणे शरीरासाठी फायद्याचे आहे. यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. (Drink carrot juice to boost the immune system)

कोरोनाच्या काळात आपण दररोज सकाळी उपाशी पोटी गाजराचा रस पिला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. गाजरात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या रक्तदाब चांगला राहतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज गाजराचा रस पिणे चांगले असते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे शरीरातील पोटॅशियमची कमतरता दूर करते. पोटॅशियम अभावी शरीरात थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात.

गाजर खाल्ल्याने हाडे निरोगी राहण्यापासून ते डोळ्यांचा कमकुवतपणा देखील दूर होतो. गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. बहुतेक लोकांना संध्याकाळच्या वेळी सूप पिणे आवडते. अशा वेळी, गाजराचे आले घालून केलेले सूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गाजर-आले सूप बनवणे खूप सोपे आहे. आपल्याला या दोन घटकांनी बनलेळे सूप तुम्हाला नक्की आवडेल.

आपण या सूपमध्ये टोमॅटो देखील घालू शकता. गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बध्दकोष्ठ आणि गॅस सारख्या समस्यापासुन आराम मिळतो. पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं. गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Drink carrot juice to boost the immune system)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI