रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या लसणाचे पाणी !

देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सध्या वाढतच चालेला आहे. या कोरोनाच्या कठिण काळात आपण घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या लसणाचे पाणी !
लसूण

मुंबई : देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सध्या वाढतच आहे. या कोरोनाच्या कठिण काळात आपण घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण कोरोनापासून दूर राहिचे असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत पाहिजे. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. (Drink garlic water every morning to boost the immune system)

आरोग्यासाठी लसूण बराच फायदेशीर आहे. लसूणच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच सर्दी, सौम्य खोकला, गॅस, आम्लपित्त, सांधेदुखीसारख्या सर्व त्रासांतून आराम मिळतो. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. तज्ज्ञ आणि डॉक्टर देखील कोरोनाचा बचाव करण्यासाठी अशा अनेक घरगुती गोष्टी घेण्याचा सल्ला देत आहेत.

यापैकीच एक आहे लसूण. लसूण अनेक प्रकारच्या समस्या दूर करतो. लसणाचे पाणी घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी गॅसवर मंद आचेवर ठेवावे लागेल. त्यानंतर त्या पाण्यात लसणाच्या नऊ ते दहा पाकळ्या घाला आणि साधारण वीस ते तीन मिनिटे उसळूद्या आणि गरम प्या. हे पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. हे पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतले पाहिजे.

काही लोक सकाळी रिक्त पोटी कच्चा लसूण खातात, त्याचे बरेच फायदे देखील आहेत. परंतु, जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल, तर तुम्ही कच्चा लसूण खाऊ नये. कच्च्या स्वरूपातील लसणीचे सेवन डोकेदुखीसाठी ट्रिगर म्हणून काम करते. लसणाच्या रसात मध आणि लिंबू मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने आपल्याला काही दिवसात फरक दिसून येईल.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Drink garlic water every morning to boost the immune system)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI