पावसाळ्यात कपडे सुकवण्याचे ‘या’ आहे सर्वात सोप्या ट्रिक्स, नक्की करा ट्राय
पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत ही एक सामान्य समस्या आहे. या ऋतूत आर्द्रता वाढते आणि सूर्यप्रकाशही कमी येतो. जर तुम्हालाही या समस्येपासून सुटका हवी असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत, जे पावसाळ्यात तुमचे कपडे सुकवण्यास मदत करू शकतात. चला जाणून घेऊयात...

पावसाळ्यात कपडे वाळवणे हा प्रत्येक महिलेला मोठा टास्क असतो. या ऋतूत सूर्यप्रकाश कमी असतो. त्याचबरोबर हवेतील आर्द्रता देखील वाढते, ज्यामुळे कपडे सुकत नाही आणि ओलाव्यामुळे वास येतो आणि कपडे दमट राहतात. त्यामुळे कपडे दमट राहिलेले कपडे घालणे देखील कठीण होते. बरेच लोकं घरात दोरी बांधून कपडे वाळवतात. पण तरीही कपडे ओले राहतात.
ही समस्या खूप सामान्य आहे. प्रत्येक घरात तुम्हाला खोलीत कपडे सुकताना दिसतीलयामुळे, अनेक वेळा लोकं त्यांचे आवडते कपडे घालू शकत नाहीत. जर तुम्हालाही पावसाळ्यात कपडे सुकवण्याचा त्रास होत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि स्मार्ट ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात सूर्यप्रकाशाशिवायही कपडे सुकवू शकाल.
पंख्याखाली वाळवा
जर तुमचे कपडे सूर्यप्रकाशाअभावी थोडेसे ओले आणि दमट असतील तर तुम्ही ते वाळवण्यासाठी फॅनचा किंवा टेबल फॅनचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही कपडे दोरीवर किंवा भिंतीवर लटकवून ठेवा. जेणेकरून कपडे लवकर सुकतील.
हीटर वापरा
हिवाळ्यात हीटरचा वापर जास्त केला जातो. पण उन्हाळ्यात तुम्ही कपडे सुकविण्यासाठी ते वापरू शकता. यासाठी तुम्ही तुमचा हीटर एका खोलीत बसवू शकता आणि त्या खोलीत थोडेसे ओले कपडे ठेवू शकता. हीटरमधून येणाऱ्या उष्णतेमुळे कपडे चांगले सुकतील. यासोबतच कपड्यांमधून येणारा वासही निघून जाईल.
हेअर ड्रायर देखील आहे प्रभावी
आतापर्यंत तुम्ही केस सुकविण्यासाठी फक्त हेअर ड्रायर वापरला असेल. पण पावसाळ्यात तुम्ही कपडे सुकविण्यासाठीही ते वापरू शकता. यासाठी थोडेसे ओले व दमट कपडे हॅन्गरवर लटकवा. नंतर तुम्ही ड्रायर मदतीने कपडे सुकवू शकता.
कपड्यांवर इस्त्री करणे
पावसाळ्यात तुम्ही कपडे प्रेस करूनही सुकवू शकता. कधी कधी कपडे काही भागांमध्ये ओले किंवा दमट राहतात, तेव्हा तिथे काही सेकंदांसाठी इस्त्री फिरवा. इस्त्रीची उष्णता कपड्यांमधील सर्व ओलावा शोषून घेते आणि कपडे कोरडे होतात. परंतु लक्षात ठेवा की या युक्त्या फक्त थोड्याशा ओल्या कपड्यांवरच काम करतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
