Weight loss : वजन कमी करायचे आहे तर आहारात अंडा पालक ऑम्लेटचा समावेश करा

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत.

Weight loss : वजन कमी करायचे आहे तर आहारात अंडा पालक ऑम्लेटचा समावेश करा
अंडा पालक ऑम्लेट

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. यामुळे व्यायाम करू देखील काही फायदा होत नाही. खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आजच आपल्या आहारात बदल करा. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. (Eat breakfast to lose weight Egg Spinach Omelette)

अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत. यामुळे आपण आहारात अंड्याचा समावेश केला पाहिजे. नाश्त्यामध्ये अंडा पालक ऑम्लेट खाणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पालकामध्ये विविध विटामिन असतात. ऑम्लेटमध्ये जर तुम्ही पालक टाकत असाल तर तुमचे वजन कमी होऊ शकते. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

विशेष म्हणजे हे अंडा पालक ऑम्लेट आपण दररोज आहारात घेऊ शकतो. नाश्तामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही. त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार राहते. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर आजच आपल्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपली चरबी कमी होते. दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Eat breakfast to lose weight Egg Spinach Omelette)