AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात आहारात ओट्स घेणे फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आहारात आपण काय खातो, हे अत्यंत महत्वाचे आहे.

कोरोना काळात आहारात ओट्स घेणे फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
| Edited By: | Updated on: May 09, 2021 | 8:47 AM
Share

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आहारात आपण काय खातो, हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण हेल्ही आहारात आपण घेतला तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. आपण कोरोनावर लवकरच मात करू शकतो. मात्र, कोरोनाच्या काळात अनेकांना अन्न खाण्यास आणि चघळण्यास त्रास होतो. अशावेळी आपण आहारात ओट्स घेतले पाहिजे. ओट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Eating oats is extremely beneficial for health)

ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्स देखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. ओट्समुळे पचनक्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रणात येते. ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ओट्स सारखा चांगला नाश्ता दुसरा काहीही असू शकत नाही.

आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते. हे शरीरातील हानिकारक घटकांचा निचरा करते आणि आतडे निरोगी ठेवते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो. आपण ते वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. एका संशोधनात असे आढळले आहे की, नाश्त्यामध्ये 1.5-6 ग्रॅम ओट्स खाल्ल्याने दिवसभर आपल्याला उत्साह येतो. तसेच यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

नाश्त्यामध्ये नेमके घटक असावेत?

सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, कबरेदके इत्यादी घटकांचा समावेश असावा.

– आपल्या आहारात तंतू असणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आजारांना लांब ठेवण्यासाठीही गरजेचं आहे.

-अंडी, मासे, दूध इत्यादी पदार्थात प्रथिनं असतात. उकडलेलं अंड किंवा अंडयातील चरबी नसलेले पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता.

-धान्यातून आणि संपूर्ण धान्याच्या ब्रेडमधूनही संमिश्र कार्बोदके मिळतात. त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळते.

-आपल्या शरीरासाठी पाणी फार गरजेचे आहेत. पाणी योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी पिण्याचे फार महत्त्व आहेत. त्यामुळे दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

(Eating oats is extremely beneficial for health)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.