वजन वाढलंय, कमी करायचंय? ज्वारीची भाकरी खा, चिंता मिटवा!

सध्या कोरोनाच्या काळात अनेकांचे वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी कार्बचे सेवन कमी करतात.

वजन वाढलंय, कमी करायचंय? ज्वारीची भाकरी खा, चिंता मिटवा!
ज्वारीची भाकरी

मुंबई : सध्या कोरोनाच्या काळात अनेकांचे वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी कार्बचे सेवन कमी करतात. यामुळे लोक गव्हाच्या पीठाची चपाती खाणे बंद करतात. हे पीठ कर्बोदकांनी समृद्ध आहे. गव्हाच्या पिठामध्ये रिफाईंड कार्ब असतात, ज्यामुळे वजन वाढते. मात्र, पोळीऐवजी काय खावे असा अनेकांना प्रश्न पडतो. (Eating sorghum is beneficial for health)

वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. ज्वारीच्या भाकरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे आपले पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते. याशिवाय यात मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ज्वारीचे पीठ पाचन शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात. ज्वारी व्हिटामिन सीचा मुख्य स्रोत आहे.

वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकरी देखील खूप फायदेशीर आहे. बाजरीमध्ये फायबर आणि पोटॅशियम भरपूर असतात. जर, आपल्याला आपले वजन नियंत्रित करायचे असेल, तर बाजरीचे पीठ आपल्यासाठी उपयुक्त आहे. बाजरी पचनास जड असल्याने, खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते. बाजरीची भाकरी खाणे शक्य नसेल तर आपण बाजरीची खिचडी देखील तयार करून खाऊ शकतो. जर तुम्हाला गोड खायला आवड असेल, तर आपण खीर बनवून देखील खाऊ शकता.

थेट फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. मात्र, फळांचा उपयोग करुन बनवलेले अनेक पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात. उदाहरणार्थ बनाना ब्रेड. बनाना ब्रेडमध्ये बनाना फ्लेवर असतो. शिवाय मोठ्या प्रमाणात साखर, फॅट्स आणि कॅलरिज देखील असतात. हे पदार्थ खूप प्रक्रिया केलेले असतात. त्यामुळे ते आरोग्याला धोकाही पोहचवू शकतात. फळांच्या कृत्रिम पेयांमध्ये केवळ 30 टक्के रस असतो. मात्र, साखरेचं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पेय टाळा.

संबंधित बातम्या : 

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार

(Eating sorghum is beneficial for health)