पहिल्यांदाच टॅटू काढताय? तर मग ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
पहिल्यांदाच टॅटू काढणाऱ्यांना अनेक प्रश्न असतात. त्यामुळे किती वेदना होतील? शरीराच्या कोणत्या भागावर टॅटू काढावा? टॅटू काढण्याचे काही दुष्परिणाम आहेत का? जर तुमचे असे प्रश्न असतील, तर आजच्या लेखात आपण त्याबद्दल जाणून घेऊयात...

आजकाल टॅटू काढण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय झालेला आहे. कारण स्टायलिश लूक आणि ट्रेंडमध्ये राहण्यासाठी अनेकजण स्वत:च्या शरीरावर टॅटू काढतात. मात्र बदलत्या जीवनशैलीनुसार टॅटू फक्त फॅशन स्टेटमेंट नाही तर एखाद्याचे व्यक्तिमत्व आणि विचार व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. काहीजण त्यांच्या भावना, काही गोड आठवणी आणि एखाद्या खास व्यक्तीबद्दलचा आदर कायम सोबत राहण्यासाठी टॅटू काढतात. पण तुम्हाला माहित आहे का की टॅटू दिसायला जितकं सुंदर दिसते तितकेच काढणे देखील कठीण आहे. टॅटू काढताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच टॅटू काढत असाल. कारण टॅटू काढणे हे केवळ आर्ट नाही, तर अशी गोष्ट आहे जी आयुष्यभर तुमच्यासोबत राहते.
यासाठी जर तुम्ही पहिल्यांदाच टॅटू काढत असाल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असायला हव्यात. तर आजच्या या लेखात टॅटू काढण्यापूर्वी तुम्हाला कोणती तयारी आणि खबरदारी घ्यावी लागेल हे आपण जाणून घेऊयात.
1. प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट निवडणे
एकदा तुम्ही टॅटू काढला की तो तुमच्या शरीरावर कायम असणार आहे. म्हणून, टॅटू काढताना प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट निवडणे महत्वाचे आहे. त्यात टॅटू आर्टिस्ट हा टॅटू काढताना वापरण्यात येणाऱ्या सुया आणि स्टेलरलाइज्ड टूल्स साधने योग्य पद्धतीने वापरत असल्याची खात्री करा. स्वस्त किंवा अस्वच्छ ठिकाणी टॅटू काढणे टाळा, कारण यामुळे त्वचेचे संक्रमण किंवा ॲलर्जी होण्याचा धोका वाढू शकतो.
2. टॅटू डिझाइन हुशारीने निवडा
टॅटू नेहमीच पर्सनॅलिटी, विचार आणि भावनांनी भरलेले असतात. म्हणून कोणत्याही ट्रेंडी टॅटूची कॉपी करू नका; त्याऐवजी, तुमचे स्वतःचे विचार असणारे टॅटू काढा. तसेच लहान टॅटूने सुरुवात करा कारण वेदना कमी होतात. जर तुम्हाला एखादा टॅटू आवडला असेल, तर प्रथम डिजिटल ट्रायल अॅप वापरून ते ट्राय करून पहा. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की टॅटू कसा दिसत आहे.
3. टॅटूसाठी स्किनची काळजी घ्या
टॅटू काढण्यापूर्वी तुमच्या स्किनची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराच्या ज्या भागावर तुम्ही टॅटू काढत असाल ती स्किन कोरडी तसेच काही जखम असल्यास किंवा सूज असल्यास त्याठिकाणी टॅटू काढणे धोकादायक ठरू शकते. म्हणून 24 तास आधी अल्कोहोल, कॅफिन किंवा वेदनाशामक औषधे घेणे टाळा. यामुळे रक्त पातळ होते आणि रक्तस्त्राव वाढू शकतो. तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी एक दिवस आधी भरपूर पाणी प्या.
4. वेदना सहन करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार रहा
पहिल्यांदा टॅटू काढणे वेदनादायक आणि तणावपूर्ण असू शकते. म्हणून टॅटू काढताना होणाऱ्या वेदनेसाठी स्वतःला मानसिकरित्या तयार करा. जर तुम्हाला वेदना सहन होत नसतील तर ते काढणे टाळा. टॅटू काढताना रिकाम्या पोटी जाणे टाळा; यामुळे चक्कर येऊ शकते किंवा अशक्तपणा येऊ शकतो. प्रक्रियेदरम्यान स्वतःला विचलित ठेवा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.
5. टॅटू काढल्यानंतर काळजी घेणे
टॅटू काढल्यानंतर त्या भागाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर टॅटूची योग्य काळजी घेतली नाही तर संसर्ग होण्याचा धोका असतो. टॅटू काढल्यानंतर, 24 तास पाण्याचा संर्पक होऊ देऊ नका. तसेच आर्टिस्टने दिलेले उपचारात्मक मलम किंवा मॉइश्चरायझर वेळोवेळी लावा. काही दिवस पोहणे, जिम करणे आणि सूर्यप्रकाशात जाणे टाळा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
