AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीराच्या ‘या’ पाच भागांवर टॅटू काढताय? तर जरा थांबा अन्यथा आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक

आजकाल टॅटू काढणे हा एक फॅशन ट्रेंड बनला आहे. मुलांपासून मुलींपर्यंत, प्रत्येकजण आपल्या शरीरावर अनेक टॅटू काढतात. शरीराच्या अनेक भागांवर टॅटू काढले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की शरीरावर अशा 5 जागा आहेत जिथे चुकूनही कधीही टॅटू काढू नये. अन्यथा, तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया शरीराचे ते 5 अवयव कोणते आहेत?

शरीराच्या 'या' पाच भागांवर टॅटू काढताय? तर जरा थांबा अन्यथा आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक
शरीराच्या 'या' पाच भागांवर टॅटू काढताय? Image Credit source: Pexabay
| Edited By: | Updated on: May 17, 2025 | 4:15 PM
Share

आजकाल टॅटू काढणे हा एक फॅशन ट्रेंड बनला आहे. तरुण पिढीपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच त्यांचे व्यक्तिमत्व खास बनवण्यासाठी टॅटू काढण्याची आवड असते. काहींना त्यांचे आवडते कोट्स शरीरावर टॅटूच्या साहाय्याने लिहिले जातात, तर काहींना एखाद्या खास व्यक्तीचे नाव किंवा चित्र कोरले जाते. टॅटूद्वारे लोक त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि त्यांचे शरीर एक कलाकृती म्हणून सादर करतात. बहुतेकजण त्यांच्या शरीराच्या अनेक भागांवर टॅटू काढतात. काही मानेवर, काही कंबरेवर आणि काही हातावर. पण तुम्हाला माहिती आहे का की शरीरावर अशा काही जागा आहेत जिथे टॅटू काढणे केवळ वेदनादायकच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते?

टॅटू काढण्यापूर्वी शरीरावरील कोणते भाग संवेदनशील आणि धोकादायक मानले जातात हे प्रत्येकासाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. चुकीच्या ठिकाणी टॅटू काढल्याने मज्जातंतूंचे नुकसान, संसर्ग किंवा त्वचेची ॲलर्जी यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर आज या लेखात आपण शरीरातील त्या 5 ठिकाणांबद्दल जाणून घेऊया जिथे चुकूनही टॅटू काढू नये.

1. हातावर टॅटू

आपल्या दैनंदिन कामांमध्ये हातांचा वापर सर्वात जास्त होतो. तसेच येथील त्वचा पातळ असते आणि वारंवार धुण्यामुळे, सूर्यप्रकाशामुळे आणि घर्षणामुळे टॅटू लवकर फिकट होऊ लागतो. याशिवाय, हातांवर टॅटू काढणे अत्यंत वेदनादायक असते कारण तिथली हाडे त्वचेच्या अगदी जवळ असतात.

2. बायसेप्सचा खालचा भाग आणि बाजू

बायसेप्सचा हा भाग शरीराचा सर्वात संवेदनशील भाग मानला जातो. टॅटू काढताना खूप वेदना होऊ शकतात. तसेच, काखेत जास्त घाम येतो, ज्यामुळे टॅटू लवकर खराब होण्याचा धोका असतो आणि त्वचेच्या संसर्गाची शक्यता देखील वाढते.

3. कोपरावर टॅटू

कोपरांवरील त्वचा जाड आणि कडक असते, पण त्यात ओलावा नसतो. यामुळे टॅटूची शाई व्यवस्थित बसत नाही आणि वारंवार टच-अप करावे लागतात. तसेच, कोपरावर टॅटू काढताना खूप वेदना होतात कारण तिथे त्वचेखाली एक हाड असते.

4. पायाचे तळवे

पायांचे तळवे हे शरीराचे असे भाग आहेत जे सतत जमिनीच्या संपर्कात असतात. येथील त्वचा जाड आहे आणि जास्त घाम येतो, त्यामुळे शाई लवकर पसरू शकते किंवा टॅटू अस्पष्ट होऊ शकतो. हालचालींमुळे येथे टॅटू काढणे जास्त काळ टिकत नाही आणि ते खूप अंकफर्टेबल असू शकते.

5. तळहातावर टॅटू

सतत काम केल्यामुळे तळहातांची त्वचा नेहमीच घर्षणाखाली असते आणि तिथली त्वचा खूप लवकर पुन्हा निर्माण होते. म्हणूनच तळहातावरील टॅटू खूप लवकर नाहीसे होतात. या भागावर टॅटू काढण्याची प्रक्रिया खूप वेदनादायक असते. जी नंतर बरी होण्यास देखील वेळ लागतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.