चांगल्या त्वचेसाठी करा ‘हे’ उपाय, येईल नैसर्गिक ग्लो

आता हिवाळा संपत आला असून उन्हाळ्याची चाहूल आता लागत आहे. उन्हाळा सुरुवात झाली की, त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात.

चांगल्या त्वचेसाठी करा 'हे' उपाय, येईल नैसर्गिक ग्लो
त्वचा

मुंबई : आता हिवाळा संपत आला असून उन्हाळ्याची चाहूल आता लागत आहे. उन्हाळा सुरुवात झाली की, त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात. उन्हाळ्या आला की, त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यावी, हे अनेकांना माहित नसते. चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे. (Follow these tips for better skin)

-दुधावरची मलई आपण थेट त्वचेवर लावू शकता. जर तुम्हाला मलईचा सुगंध आवडत नसला तर यामध्ये आपण चंदनाची पावडर मिक्स करू शकता. दोन्ही सामग्री नीट मिक्स करून त्वचेवर लावा.

-या नैसर्गिक उपचारामुळे त्वचा मऊ होण्यास मदत मिळते. दुधामध्ये प्रोटीन आणि लॅक्टिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असते. हे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. दुधाच्या तुलनेत मलईचा वापर केल्यास त्वचेला अधिक प्रमाणात नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइर मिळते.

-तुमची त्वचा अधिक कोरडी असेल तर मलईमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब मिक्स करा. त्वचेवर बारीक-बारीक पुरळ असल्यास किंवा त्वचेला खाज येत असल्यास मलईमध्ये लिंबाचा रस मिक्स करू शकता.

-चेहऱ्याव्यतिरिक्त आपण मानेवरही दुधाची मलई लावू शकता. तसंच लोशनप्रमाणे संपूर्ण शरीरावरही मलईचा उपयोग करू शकता. आपल्या आवश्यकतेनुसार लिंबाच्या रसाचे काही थेंब किंवा गुलाब पाण्याचे काही थेंब मलईमध्ये मिक्स करा.

-मोहरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. हे घटक आपल्या त्वचेचं कित्येक प्रकारच्या विकारांपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात.

संबंधित बातम्या : 

(Follow these tips for better skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI