दररोज शिफ्ट बदलणाऱ्यांमध्ये मानसिक तणावाचा धोका अधिक

शिफ्टमध्ये दररोज बदल झाल्याने अनेकांना मानसिक त्रासाला (Changes In Shift Increases Risk Of Mental Disease) सामोरी जावं लागतं असे एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

दररोज शिफ्ट बदलणाऱ्यांमध्ये मानसिक तणावाचा धोका अधिक

मुंबई : मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या मेट्रो शहरात खाजगी क्षेत्रातील कंपन्यात वाढ झाली आहे. या कंपन्यांमध्ये 24 तास काम करण्याचे प्रमाण (Changes In Shift Increases Risk Of Mental Disease) वाढले आहे. यामुळे खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा वेगवेगळ्या वेळी कामावर यावं लागत. दररोज बदलणाऱ्या शिफ्टमुळे अनेकांना लठ्ठपणा आणि मधुमेह अशी गंभीर आजार होतात. इतकंच नव्हे तर शिफ्टमध्ये दररोज बदल झाल्याने अनेकांना मानसिक त्रासाला (Changes In Shift Increases Risk Of Mental Disease) सामोरं जावं लागतं असे एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

खाजगी कंपनीत शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये झोपेचा अभाव जाणवतो, असेही या अभ्यासात समोर आलं आहे. तर 9 ते 5 या वेळेत काम करणाऱ्यांपेक्षा शिफ्ट करणाऱ्यांच्या तुलनेत नैराश्य आणि अस्वस्थतेचे प्रमाण जास्त असते. तसेच शिफ्टमध्ये काम करणाऱ्या 28 टक्के लोकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत. या अभ्यासात जवळपास 28 हजार 438 लोकांचा सहभाग असून 7 वेळा याबाबतचा अभ्यास करण्यात (Changes In Shift Increases Risk Of Mental Disease) आला.

ब्रिटेनच्या एका विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार, शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण 33 टक्के होते. हे प्रमाण नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत तुलना (Changes In Shift Increases Risk Of Mental Disease) केली आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनुसार, दर वेळी शिफ्टची वेळ बदलल्याने झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेत बदल होतो. नेहमी नेहमी होणाऱ्या या बदलाचे शरीरावर घातक परिणाम होतात. त्यामुळे अनेकांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. या शिवाय मूड स्विंग होणे, मित्र किंवा घरातील कुटुंबांला वेळ न देणे याचाही त्रास आपल्याला जाणवतो.

यावर उपाय म्हणजे तुम्ही नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच दिवसाच्या उजेडात बाहेर पडा. कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल असेही संशोधनकर्त्यांनी सांगितले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *