AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digestive Biscuit | सकाळच्या चहासोबत ‘डायजेस्टिव्ह बिस्कीट’ खाणे आरोग्यासाठी हानिकारक! ‘हे’ गंभीर आजार होण्याची शक्यता

बहुतेक लोकांना नाश्त्यामध्ये चहासोबत बिस्किटे खाणे खूप आवडते. एखाद्या दिवस चहासोबत बिस्कीट नसल्यास काही लोकांचा दिवसच पूर्ण होत नाही.

Digestive Biscuit | सकाळच्या चहासोबत ‘डायजेस्टिव्ह बिस्कीट’ खाणे आरोग्यासाठी हानिकारक! ‘हे’ गंभीर आजार होण्याची शक्यता
| Updated on: Jan 13, 2021 | 10:49 AM
Share

मुंबई : आपल्यापैकी बहुतेक लोकांना नाश्त्यामध्ये चहासोबत बिस्कीटे खाणे खूप आवडते. एखाद्या दिवस चहासोबत बिस्कीट नसल्यास काही लोकांचा दिवसच पूर्ण होत नाही. बऱ्याचदा आपण खास ‘डायजेस्टिव्ह बिस्कीट’ खरेदी करतो. या प्रकारच्या बिस्कीटांच्या जाहिराती टीव्ही आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील नेहमी दाखवल्या जातात. या जाहिरातींमुळे आपण असा विचार करतो की, या बिस्कीटांत साखर, चरबी आणि सोडियम हे घटक नसतात किंवा कमी प्रमाणात असतात, यामुळे आपली भूकही शमेल आणि आरोग्य देखील चांगले राहील. मात्र, या सगळ्या गोष्टी सत्य नाहीत (Harmful Side effects of Digestive biscuit).

याउलट अशा बिस्किटांमध्ये साखर, चरबी, सोडियम आणि रिफाइंड पीठाचे प्रमाण जास्त असते. या बिस्किटांमध्ये चव वाढवणारी रासायने अर्थात टेस्ट इनहेंसर देखील टाकले जातात. परंतु, आपल्याला हे माहित आहे का की, ही डायजेस्टिव्ह बिस्कीटे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत कि अत्यंत हानिकारक? चला तर याबद्दल संपूर्ण माहिती आणि याचे दुष्परिणाम जाणून घेऊया…

या बिस्किटांमध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.

सर्व बेकरी प्रोडक्ट मैद्यापासून बनवलेले असतात. मात्र, डायजेस्टिव्ह बिस्किटांमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले जाते, असा दावा केला जातो. मात्र गव्हाच्या पिठामध्ये ग्लूटेन असते. प्रत्येक ब्रँडमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ग्लूटेन वापरले जाते. ग्लूटेनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोट दुखणे, गॅस, अतिसार आणि बद्धकोष्ठता या सारख्या समस्या उद्भवू शकते.

बिस्किटांत साखर असतेच!

इतर बिस्किटांपेक्षा डायजेस्टिव्ह बिस्कीटे कमी गोड असतात परंतु, या बिस्किटांत नैसर्गिक गोडव्यासह, साखर देखील वापरली जाते. ही बिस्किटे साखरविरहित नसतात. ही बिस्किटे खाताना आपण अतिरिक्त साखरेचे सेवन करता. जर या बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित पातळीपेक्षा जास्त असेल, तर लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते (Harmful Side effects of Digestive biscuit).

सॅच्युरेटेड फॅटदेखील हानी पोहोचवते.

अशा बिस्किटांच्या पॅकेटवर चरबी रहित असल्याची नोंद असते. परंतु, त्यात सॅच्युरेटेड फॅट आणि इतर चरबीयुक्त पदार्थ पर्याय म्हणून वापरले जातात. जास्त सॅच्युरेटेड फॅट घेतल्यास कोलेस्टेरॉल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांचा बळी पडण्याचा धोका देखील वाढतो.

प्रिजरवेटिव्ह्सचा वापर

बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या बिस्किटांप्रमाणेच या बिस्किटांमध्ये प्रीझर्वेटिव्ह्ज टाकले जातात. यामुळे ते बर्‍याच दिवसांपर्यंत खराब न होता टिकून राहू शकतील. सुगंधासाठी या बिस्किटांमध्ये इसेंस देखील टाकले जातात. इसेंस एक रसायन आहे, जे आपल्या शरीराला कधी कधी हानिकारक ठरू शकते.

सोडियममुळेही वाढतात अडचणी

अशा बिस्किटांची चव वाढवण्यासाठी आणि त्यांना हलके बनवण्यासाठी सोडियम घटक मिसळले जातात. जर, आपण जास्त सोडियमयुक्त बिस्किटे खात असाल, तर ते उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या घातक रोगांना कारणीभूत ठरू शकते.

(Harmful Side effects of Digestive biscuit)

हेही वाचा :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.