ना चिकन, ना चमचमीत पदार्थ खाणं… 73 व्या वर्षीही फिट अँड बोल्ड.. जीनत अमानसमोर सर्वच नट्या फिक्या
Zeenat Aman Fitness Secret: 73 वर्षांच्या वयातही अभिनेत्री झीनत अमान यांने आरोग्य निरोगी आणि ग्लॅमरस आहे. त्यांचा डाएट प्लॅन साधा आणि आरोग्यदायी आहे, ज्यामध्ये ब्लॅक टी, बदाम, एवोकॅडो टोस्ट, डाळ-भाजी आणि भाजलेले मखाना यांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया झीनत अमान यांचा सिक्रेट मंत्रा.

झीनत अमान 1970-80 च्या दशकातील टॉप आणि सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. झीनत त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या सौंदर्यामुळे आणि हॉट फिगरमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होत्या. आजही त्यांच्या 73 व्या वर्षी झीनत अमान यांच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते. आजही त्यांच्या चेहऱ्यावरील तेज, चमक चाहत्यांना आकर्षित करते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? फिटनेसच्या दृष्टीने झीनत अमान आजच्या अभिनेत्रींना टक्कर देताना पाहायला मिळत आहे. या वयामध्ये झीनत अमान यांनी काही त्यांच्या फिटनेस ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी आणि फिट आहे.
अलीकडेच झीनत अमान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या या वयातील फिटनेस मंत्रा त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. झीनत अमान 73व्या वर्षी त्यांचं आआरोग्य निरोगी कसं ठेवतात या बद्दल त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे. या पोस्टमध्ये झीनत अमान यांचे डाएट प्लॅन काय आहे? हे समजते. ही पोस्ट पाहून असे कळते की झीनत अमान यांना निरोगी शरीरासाठी पौष्टिक पदार्थांचे समावेश करणे आवडते. त्या कोणत्याही प्रकारचे कडक डायट करत नाही.
झीनत अमान यांच्या मते, नाशत्यामध्ये तुम्ही जर योग्य प्रमाणात पोषक आहार घेतला तर तुमचं आरोग्य निरोगी होण्यास मदत होते. त्यांची आई म्हणायची की, निरोगी शरीरासाठी कमी प्रमाणात खाल्ले तर चालले तर चालेल पण, ते पदार्थ ताजे असणे गरजेचे असते. झीनत अमान यांच्या दिवसाची सुरूवात सकाळच्या काळ्या चहाने होते. त्यासोबतच एक वाटी भिजवलेले आणि सोललेले बदाम खाण्यास पसंती देतात. भिजलेल्या बदामाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढण्यास मदत होते. गेल्या काही वर्षांपासून, झीनत अमान त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये एवोकॅडो आणि चेडर चीजसह टोस्टचे सेवन करतात. ज्यावेळी त्यांना देसी आणि चटकदार खावसं वाटते त्यावेळी त्या पोहे किंवा बेसना चिल्ला खातात. झीनत अमान यांना जेवण भरपूर आवडतं. त्यामुळे त्यांच्या मते, दुपारच्या जेवणामध्ये तुमच्या आहारामध्ये पौष्टिक आहाराचे समावेश करणे गरजेचे असते. दुपारच्या जेवणामध्ये डाळ, भाज्या, रोटी अशा अगदी साध्या पण पौष्टिक पदार्थांचा समावेश कराता. अनेकवेळा त्यांना आंबट डाळ, हिरव्या मसाल्यांनी बनवलेली बटाटा-वाटाणा करी, पनीर टिक्का आणि घरी बनवलेली टोमॅटो चटणी खायला आवडते.
View this post on Instagram
संध्याकाळी 5 वाजता झीनत अमान यांना एक वाटी रोस्टेड मखाना खायला आवडतो. त्यामध्ये थोडे मीठ आणि मसाले मिक्स केल्यामुळे त्याची चव वाढते. त्यांनी पोस्टमध्ये सागितले की ती जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाणे टाळते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातून गोड पदार्थ पूर्णपणे काढून टाकले आहेत असे नाही परंतु नियमित सेवन करणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही झीनत अमानसारखे 70 वर्षांच्या वयातही निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही तिच्या डाएट प्लॅन फॉलो करू शकता. त्याचा आहार अतिशय साधा, संतुलित आणि निरोगी आहे, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदे होतात.