उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा अतीवापर करू नका, तुम्हालाच पडेल भारी !
उन्हाळ्यात लोक अनेक घरगुती उपायांचा अवलंब करतात ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते. आरोग्य किंवा त्वचेवरील उपायांचा अवलंब करण्यापूर्वी योग्य माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी तुम्ही या चुका पुन्हा करत आहात का ?

मुंबई : उन्हाळ्यात डिहायड्रेशन (dehydration) , अतिसार, जास्त घाम येणे आणि त्वचा जळणे यासारख्या समस्या उद्भवणे सामान्य आहे. रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे ही बहुतांश नागरिकांची मजबुरी आहे. जास्त वेळ उन्हात राहिल्याने उष्माघाताचा (heat stroke) धोका असतो. उष्माघाताच्या लक्षणांमध्ये उलट्या किंवा जुलाब, डोकेदुखी यांचा समावेश होतो. या अवस्थेत लोक औषधांसोबत घरगुती उपाय (home remedies) करून बघतात. नारळाचे पाणी पिण्यासारख्या पद्धतींनी उष्णतेवर मात करणे चांगले आहे, परंतु काहीवेळा उपचारांमध्ये केवळ घरगुती उपाय वापरणे धोकादायक ठरू शकते.
उन्हाळ्यात लोक अनेक घरगुती उपायांचा अवलंब करतात ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते. आरोग्य किंवा त्वचेवरील उपायांचा अवलंब करण्यापूर्वी योग्य माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी तुम्ही या चुका पुन्हा करत आहात का ?
सत्तूमुळेही होऊ शकते नुकसान
उष्णतेवर मात करण्यासाठी, हरभऱ्यापासून बनवलेले सत्तू खाणे भारतात सामान्य आहे. सत्तूच्या पेयापासून ते पराठ्यापर्यंत अनेक गोष्टी लोक खातात. हे पोट शांत ठेवते आणि चयापचय सुधारते, परंतु सत्तू जास्त प्रमाणात सेवन केल्याने उलट्या देखील होऊ शकतात. सत्तूमध्ये फायबर असते आणि त्याचे जास्त सेवन केल्याने पोटात पेटके येणे किंवा अतिसार होऊ शकतो.
जास्त पाणी पिणे
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे, ही एक मोठी समस्या ठरू शकते. परंतु काही वेळा, जास्त पाणी पिणे देखील कठीण होऊ शकते. वास्तविक, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आपली हानी करतो आणि पाण्याच्या बाबतीतही तसेच आहे. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे.
जास्त ज्यूसचे सेवन करणे
उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी ज्यूसचे सेवन हा एक उत्तम उपाय आहे. पण त्याचे सेवनही मर्यादेतच केले पाहिजे. लोक दिवसातून दोन ग्लास रस पितात. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी बिघडू शकते. दिवसातून एक ग्लास ज्यूस प्यावा, तोही तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच.
लिंबाचे अतिसेवन घातक
व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतेच पण उष्णता टाळण्यासही मदत करते. लोक व्हिटॅमिन सी साठी लिंबाचे सरबत पितात, परंतु जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्यानेही नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत तुम्ही रोज पिऊ शकता, पण त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या.
