Home Remedies | ‘डार्क अंडर आर्म्स’च्या समस्येतून मुक्ती हवीय? मग, ‘या’ सोप्या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

जर तुम्हालाही डार्क अंडर आर्म्स समस्येमुळे त्रास होत असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही काही दिवसातच या समस्येतून मुक्त होऊ शकता.

Home Remedies | ‘डार्क अंडर आर्म्स’च्या समस्येतून मुक्ती हवीय? मग, ‘या’ सोप्या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
‘डार्क अंडर आर्म्स’च्या समस्येतून मुक्ती हवीय?
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 1:29 PM

मुंबई : आपल्या शरीरावरील अवांछित केस अर्थात नको असलेले केस काढून टाकण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या उपाययोजना करतात. नको असलेले हे केस काढून टाकण्यासाठी त्या रेझर, वॅक्सिंग क्रीम आणि हेअर रिमुव्हल क्रीम वापरतात, ज्यामुळे काखेत अर्थात ‘अंडर आर्म्स’वर काळ्या रंगाचे डाग पडतात. या व्यतिरिक्त, बॉडी डियोड्रेंटच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. अंडर आर्म्सवर काळे डाग असल्यामुळे मुली स्लीव्हलेस टॉप किंवा ट्यूब टॉप घालण्यास संकोच करतात (Home Remedies for darken under arms problem).

जरी अशा प्रकारचे कपडे परिधान केले, तरीही त्यांचे पूर्ण लक्ष आपल्या हातांच्या हालचालीकडे लागून राहते. मुलींच्या या समस्येवर आमच्याकडे एक अचूक उपाय आहे. जर तुम्हालाही डार्क अंडर आर्म्स समस्येमुळे त्रास होत असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही काही दिवसातच या समस्येतून मुक्त होऊ शकता.

बेकिंग सोडा

डार्क अंडरआर्म्सपासून मुक्त होण्यासाठी बेकिंग सोडा हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी, आपल्याला बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवावी लागेल. ही पेस्ट अंडर आर्म्समध्ये लावावी आणि ती पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर स्वच्छ धुवून टाकावी. ही पेस्ट आठवड्यातून दोन दिवस लावा आणि अंडर आर्म्स स्क्रब करा. लवकरच फरक दिसून येईल.

खोबरेल तेल

खोबरेल तेल नैसर्गिकरित्या त्वचेचा उजळपणा वाढवण्याचे काम करते. कारण, त्यात व्हिटामिन ईचे गुणधर्म आहेत. अंडर आर्मच्या काळपटपणापासून मुक्त होण्यासाठी खोबरेल तेलाने 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि नंतर अंडर आर्म्स पाण्याने धुवा (Home Remedies for darken under arms problem).

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर नैसर्गिक क्लीन्सर सारखे काम करते. यासाठी, आपल्याला 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये थोडा बेकिंग सोडा घालून पेस्ट तयार करावी लागेल. हे मिश्रण आपल्या अंडर आर्म्समध्ये व्यवस्थित लावा. ही पेस्ट व्यवस्थित कोरडी झाल्यावर अंडर आर्म्स पाण्याने धुवा.

लिंबू

लिंबू हा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. अर्धा लिंबू कापून त्याने अंडर आर्म्सवरील गडद भागावर स्क्रब करा. रोज आंघोळ करण्यापूर्वी 2-3 मिनिटांपर्यंत अशा प्रकारे लिंबूचा स्क्रब करा. काही दिवसातच अंडर आर्म्सच्या काळपटपणापासून मुक्त व्हाल.

कोरफड

कोरफडचा ताजा गर काढून, त्याने अंडर आर्म्स स्क्रब करा आणि 15 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. याने त्वचा मुलायम देखील होईल आणि त्वचेवरील काळपटपणादेखील कमी होईल.

ऑलिव ऑईल

एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा ब्राउन शुगर मिसळून घरच्या घरीच एक्फोलीएटर तयार करा. ही पेस्ट काही मिनिटांसाठी अंदर आर्म्सवर लावा. ही पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर पाण्याने धुवा.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Home Remedies for darken under arms problem)

हेही वाचा :

कोरोना काळात कामी येतील ‘या’ आयुर्वेदिक टिप्स, वाचा याचे महत्त्वपूर्ण फायदे…

दिवसभर सक्रिय राहायचेय? मग ‘हे’ 6 हेल्दी ब्रेकफास्ट खा !

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.