AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या उन्हाळ्याच्या सुट्टीत ऊटीची ट्रीप प्लॅन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवाच

काही लोकं ऊटी शहराला निलगिरीची राणी असेही म्हणतात. कारण येथे असलेल्या हिरव्यागार डोंगर भाग, चहाचे मळे, शांत तलाव आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. पण उटीला ट्रिप प्लॅन करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेणे गरजेचे आहे.

या उन्हाळ्याच्या सुट्टीत ऊटीची ट्रीप प्लॅन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवाच
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2025 | 10:00 PM

ऊटी हे भारतातील तामिळनाडू राज्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, जे निलगिरी पर्वतांच्या सुंदर दऱ्यांमध्ये वसलेले आहे. हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे, थंड हवामानामुळे आणि अद्भुत पर्यटन स्थळामुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अशातच आता काही दिवसांनी मुलांच्या परिक्षा संपणार आहेत, त्यानंतर उन्हाळ्या सुट्टया सुरू होतील. त्यामुळे एप्रिल महिन्यात, बहुतेक कुटुंबे आणि कपल्स या सुंदर ठिकाणाना भेट देण्यासाठी जात असतात. अशातच तुम्ही सुद्धा मुंबईच्या रणरणत्या उन्हापासुन दुर जायचे असेल तर तुम्ही हिल्स स्टेशनला भेट द्या. अशात तुम्हीही उटीला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुमची सहल अधिक मजेदार आणि संस्मरणीय होण्यासाठी तुम्हाला त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

ऊटीला कसे पोहोचायचे

विमान मार्गे: ऊटीचे स्वतःचे विमानतळ नाही, परंतु जवळचे विमानतळ कोइम्बतूर आहे, जे सुमारे ८८ किमी अंतरावर आहे. येथून तुम्ही टॅक्सी किंवा बसने उटीला पोहोचू शकता.

रेल्वेने: ऊटीला जाण्यासाठी तुम्ही मेट्टुपलयमला जाणारी एक्सप्रेस पकडून उटीला जाऊ शकता आणि नंतर येथून प्रसिद्ध नीलगिरी माउंटन रेल्वेने ऊटीला जाण्याचा प्रवास करता येतो.

रोडने: ऊटी शहर हे काही प्रमुख शहर जसे की कोइम्बतूर, बंगळुरू आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. येथे फिरण्यासाठी तुम्हाला बसेस, टॅक्सी आणि भाड्याने वाहने देखील उपलब्ध आहेत.

उटीला भेट देण्याचा सर्वोत्तम महिने कोणते?

ऊटीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान असतो . या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक राहते. उन्हाळ्यात उटीचे तापमान २० ते २५° सेल्सिअस पर्यंत असते.

ऊटीला फिरायला जाण्याचे ठिकाण

ऊटी तलाव: ऊटीचा सुंदर तलाव, जिथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता.

नीलगिरी माउंटन रेल्वे: येथे असे काही जागतिक वारसा असलेले ठिकाण आहेत जे मेट्टुपलयम ते ऊटी पर्यंतचा एक सुंदर प्रवास घडवुन आणते.

दोड्डाबेट्टा शिखर: हे ऊटीमधील सर्वात उंच शिखर आहे, जिथून संपूर्ण शहराचे मनमोहक दृश्य पाहता येते.

बोटॅनिकल गार्डन: यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आणि फुलांचा सुंदर संग्रह आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी परिपूर्ण आहे.

वेलिंग्टन आणि कासा तलाव: हे शांत आणि सुंदर ठिकाणे आहेत जिथे तुम्ही ट्रेकिंग करू शकता.

खाद्यपदार्थ आणि पेय

ऊटीमध्ये, तुम्ही येथील स्थानिक रेस्टॉरंट्समध्ये इडली, डोसा, उत्तपम यासारख्या पारंपारिक दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता, याशिवाय, तुम्ही चहा आणि कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या ऊटीच्या बागामधील ताजे पदार्थ खरेदी करू शकता.

कुठे राहायचे

ऊटीमध्ये राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जसे की लक्झरी हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होमस्टे. तुमच्या सोयी आणि बजेटनुसार तुम्ही येथे राहण्याची व्यवस्था निवडू शकता. तुम्हाला ओटाक्कल, शार्लोट आणि कॉलेज रोड सारख्या भागात राहण्याची सोय मिळेल.

सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.