टॅन झालीये तुमची त्वचा ? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कसे घालवावे टॅनिंग ?
उन्हात बाहेर पडल्यावर त्वचा टॅन होणे सामान्य गोष्ट आहे. पण ते दूर करण्यासाठी अनेक खास पद्धती वापराव्या लागतात. असे असूनही, टॅनिंगपासून मुक्त होणे हे खूप कठीण काम आहे. पण काही सोप्या पद्धतीच्या मदतीने सहजपणे टॅन काढू शकतो.

Tips to Remove Skin Tanning : उन्हाळ्याच्या दिवसांत कोणालाही कडक उन्हात बाहेर पडायचे नसते, पण बहुतेकांना घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत, तुम्हाला केवळ उष्णतेचाच सामना करावा लागत नाही, तर त्वचा टॅन (Skin Tanning) होण्याची समस्या देखील सहन करावी लागते. त्यामुळे आराम मिळण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क आणि सनस्क्रीन (sunscreen) वापरतात. पण असे असूनही त्वचा टॅन होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्किन टॅनिंग दूर करण्याचा सोपा उपाय सांगत आहोत.
त्वचेची टॅनिंग दूर करण्याचा हा सोपा पण प्रभावी मार्ग आहे. चला तर मग जाणून घेऊया हात आणि पायांचे टॅनिंग दूर करण्याचा प्रभावी उपाय.
तज्ज्ञ काय सांगतात ?
हा घरगुती उपाय तयार करण्यासाठी दोन चमचे हळद पावडर घ्या. नंतर तव्यावर हळद टाकून नीट भाजून घ्या. लक्षात ठेवा की हळदीचा रंग तपकिरी होईपर्यंत भाजायचा आहे. आता एका भांड्यात हळद काढून थंड होऊ द्या. नंतर त्यात थोडे कच्चे दूध आणि सुमारे एक चमचा मध घाला आणि सर्वकाही मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट शरीराच्या ज्या भागांवर टॅनिंग दिसत असेल त्या भागांवर तुमच्या गरजेनुसार लावा. नंतर ही पेस्ट काही वेळ तशीच राहू द्या, थोड्या वेळाने साध्या पाण्याने धुवा. याच्या मदतीने तुमच्या त्वचेचे टॅनिंग काही मिनिटांत सहज निघून जाईल.
हे उपायही ठरतील फायदेशीर
त्वचेवरील टॅन काढण्यासाठी तुम्ही दह्याचीही मदत घेऊ शकता. यासाठी दोन चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ मिसळून पेस्ट तयार करा. नंतर ते टॅनिंग झालेल्या भागावर लावा आणि काही वेळ स्क्रब करा. त्यानंतर दहा मिनिटांनी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.
टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. यासाठी एका लिंबाचा रस काढून त्यात एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट त्वचेवर लावा आणि पंधरा मिनिटे तशीच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
