AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांना पहिल्यांदा लिहायला कसे शिकवायचे? बालरोगतज्ज्ञांनी सांगितली ‘ही’ कमालची ट्रिक, Handwriting पण होईल सुंदर

मुलांना लिहायला शिकवण्यासाठी एका बालरोगतज्ञांनी सांगितली अतिशय सोपी ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक तुमच्या मुलाचे हस्ताक्षर देखील सुधारेल. चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

मुलांना पहिल्यांदा लिहायला कसे शिकवायचे? बालरोगतज्ज्ञांनी सांगितली 'ही' कमालची ट्रिक, Handwriting पण होईल सुंदर
मुलांना पहिल्यांदा लिहायला कसे शिकवायचे? बालरोगतज्ज्ञांनी सांगितली 'ही' कमालची ट्रिक, Handwriting पण होईल सुंदरImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Nov 04, 2025 | 2:40 PM
Share

पहिल्यांदा लिहायला शिकणे ही प्रत्येक मुलासाठी एक नवीन सुरुवात असते. त्याचबरोबर मुलांना योग्य पद्धतीने लिहायला शिकवणे हे पालकांसाठी कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. बहुतेक पालकांना समजत नाही की आपल्या मुलांना लिहण्याची सुरुवात कशी करावी. जर तुम्हीही अशाच परिस्थितीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. बालरोगतज्ञांनी मुलांना लिहायला शिकवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाचे हस्ताक्षर सुधारू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण या ट्रिक बद्दल अधिक जाणून घेऊयात.

मुलांना पहिल्यांदा लिहायला शिकवताना नेमकी काय शिकवावे?

पालक अनेकदा आपल्या मुलांना अ, ब, क, ख, ग ही अक्षरे लिहायला शिकवतात. पहिल्यांदाच ही अक्षरे लिहत असताना मात्र मुलांवर दबाव वाढतो आणि त्यांना लिहिण्याची भीती वाटते. तर असं न करता मुलांना लिहायला शिकवण्याची सुरुवात अक्षरांनी नव्हे तर रेषा आणि एखादे चौकोन, गोलाकार असे आकार काढायला शिकवावे.

जेव्हा मुलांची बोटांनी पेन्सिल पकडण्याची पकड, हाताची हालचाल आणि डोळ्यांशी समन्वय मजबूत होतो तेव्हाच त्यांचे हस्ताक्षर चांगले विकसित होते. तर यासाठी मुलांना कागद आणि पेन्सिल द्या आणि त्यांना हवे तसे त्यावर रेखाटू द्या. ते वाकड्या रेषा काढत असोत किंवा वर्तुळाकार गोलाकार, ही त्यांची पहिली प्रॅक्टिस असते. यामुळे मुलांना पेन्सिल पकडण्याची आणि त्यांना लिहीण्याची आवड निर्माण होते.

यानंतर मुलांना या तीन प्रकारच्या रेषांचा सराव करायला लावा-

  • उभ्या रेषा
  • आडव्या रेषा
  • तिरक्या रेषा

या रेषांच्या सरावामुळे मूलं हळूहळू त्याच्या हातांची दिशा आणि दाब समजून घेण्यास शिकतात. एकदा या रेषा योग्यरित्या काढायला शिकलेत की पुढे त्यांना गोल काढायला शिकवा त्यानंतर झिगझॅग लाईन काढायला लावा किंवा लहान आकार यांचा सराव केल्याने मुलांच्या बोटांना बळकटी देतात आणि त्याला पेन्सिल धरण्याचा आत्मविश्वास पक्का होतो.

लेखन करणे ही एक प्रक्रिया आहे, कोणती स्पर्धा नाही. त्यामुळे त्यांना अ,आ, ई लिहायला शिकवण्याआधी त्यांना त्यांच्या पद्धतीने लिहण्याचा आनंद घेऊ द्या. जेव्हा एखादे मूल भीतीशिवाय कागदावर स्वतःच्या मनाने काही लिहितो तेव्हा त्यांना लिहण्यास आवड निर्माण होते. या दृष्टिकोनाचा अवलंब केल्याने, तुमचे मूलं केवळ लवकर लिहायला शिकणार नाही तर ते व्यवस्थित आणि सुंदर हस्ताक्षर देखील काढायला शिकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.