AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरटीचा फक्त एक छोटा खडा, अन् उन्हाळ्यातील ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या

उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी तुरटीचा वापर कसा करू शकता ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

तुरटीचा फक्त एक छोटा खडा, अन् उन्हाळ्यातील 'या' समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या
turtiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Apr 11, 2026 | 10:39 AM
Share

तुरटीच्या गुणधर्मांमुळे त्याचा वापर घरात अनेक प्रकारे केला जातो. लहानशी जखम झाल्यावर तसेच दुखापतीमुळे दात सैल झाल्यास, त्याशिवाय एखाद्या ठिकाणी मुक्का मार लागल्यावर रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून देखील तुरटीचा वापर केला जातो. कारण तुरटी नैसर्गिक आणि पारंपारिक उपाय म्हणून वापरणे अतिशय फायदेशीर ठरते. तुरटी संसर्गापासूनही संरक्षण करते. याव्यतिरिक्त तुरटी त्वचा थंड ठेवते, बॅक्टेरिया दूर करते, घाम, पुरळ, खाज,त्वचेची दुर्गंधी यावर ही इवलीशी तुरटी जबरदस्त काम करते. तर आजच्या या लेखात आपण तुरटीचे असे पाच उपयोग जाणून घेणार आहोत, जे उन्हाळ्यातील समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.

घामाचा वास दुर करते

उन्हाळ्यात काही लोकांना घामाचा वास खूप त्रासदायक वाटतो. त्यामुळे त्यांना काही ठिकाणी खूप लाजिरवाणे सुद्धा वाटू शकते. हा वास खरंतर घामामुळे येत नाही तर तो जीवाणूंमुळे येतो. जर तुम्हालाही उन्हाळ्यात या समस्येचा त्रास होत असेल, तर तुरटी थोडी ओली करून काही सेकंदांसाठी काखेत चोळा.

फंगल संसर्गापासून संरक्षण करते

तुरटी तुम्हाला फंगल संसर्गापासूनही वाचवू शकते. दमट उन्हाळ्याच्या हवामानामुळे अनेकदा त्वचेवर पुरळ, खाज आणि जळजळ होते. हे टाळण्यासाठी, तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटीची पूड मिक्स करा. यामुळे घामाचा वास टाळण्यासही मदत होईल. जर तुमची त्वचा विशेषतः कोरडी असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्यात ग्लिसरीन मिक्स करून त्वचेला लावल्याने कोरड्या त्वचेच्या समस्या दुर होतात.

तेलकट त्वचेसाठी उपयुक्त

जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि उन्हाळ्यात तुमचा चेहरा खूप चिकट होतो. तर ही समस्या कमी व्हावी यासाठी तुरटी उपयुक्त ठरू शकते. तुम्ही तुरटीपासून टोनर बनवू शकता. १ कप पाण्यात १ चमचा तुरटीची पावडर‍ टाका आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.

मुरुम कमी होतील

उन्हाळ्यात तुम्हाला मुरुमांचा त्रास होत असेल तर, चिमूटभर तुरटीची पावडर दह्यात मिसळून लावा. यामुळे जीवाणू नष्ट होतात आणि मुरुमे कमी होतात. तसेच यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास आणि त्वचा उजळ होण्यासही मदत होते. हे मिश्रण आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच लावावे.

तोंडाची दुर्गंधी रोखते

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकदा लाळेचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. जर तुमच्या बाबतीत असे होत असेल, तर पाण्यात तुरटी विरघळवून त्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. यामुळे जीवाणू नष्ट होतील आणि तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. तसेच यामुळे तुमचे दात आणि हिरड्या निरोगी राहण्यासही मदत होते.

हे लक्षात ठेवा

तुरटी हे अनेक फायदे असलेले एक पॉवरफूल खनिज आहे, परंतु त्याचा योग्य वापर न केल्यास त्वचेवर कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते, म्हणून त्याचा वापर मर्यादित प्रमाणातच करावा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर किंवा आधी पॅच टेस्ट केल्यानंतरच त्याचा वापर करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......