AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी बीटचा ‘हा’ रस अत्यंत फायदेशीर, वाचा!

कोरोना काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण खाण्या-पिण्यावर जास्तच भर दिला.

Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी बीटचा 'हा' रस अत्यंत फायदेशीर, वाचा!
बीटचा रस
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : कोरोना काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण खाण्या-पिण्यावर जास्तच भर देत आहोत. मात्र, यादरम्यान आपण अनहेल्दी अन्न देखील जास्त प्रमाणात खात आहोत. यामुळे आपले वजन वाढत जात आहे. आता वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आोहत. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. (Beet juice is extremely beneficial for weight loss)

बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते आणि रक्त शुद्ध करते. त्यात आढळणारे अँटिऑक्सिडेंटस शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. बीटचा रस आपण जर दिवसातून दोनदा घेतला तर आपले वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. बीटचा रस घरी नेमका कसा करायचा हे आपण बघणार आहोत.

– पाणी 3 कप

– 8-9 पुदीना पाने

– अॅपल साइडर व्हिनेगर 2 चमचे

– 2 चमचे लिंबाचा रस

– 7 चमचे बीटचा रस

प्रक्रिया –

पुदीनाची पाने, अॅपल सायडर व्हिनेगर, लिंबाचा रस आणि बीट मिक्स करा आणि साधारण 5-10 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये पाणी मिक्स करा. रिकाम्या पोटी हे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे अॅपल सायडर व्हिनेगरमुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. बीटाच्या रसात पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. जे नसा आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतो. बीटचा रस योग्य प्रमाणात पिण्यामुळे शरीरात पोटॅशियमची पातळी चांगली राहते.

शरीरात पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि स्नायू दुखीचा त्रास होतो. पोटॅशियम कमी झाल्यास हृदयरोगाचा धोका देखील वाढतो. अनियमित जीवनशैली, जास्त प्रमाणात मद्यपान आणि अधिकचे जंक फूड खाण्याने यकृताचे नुकसान होते. बीटामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे यकृतामध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात. तसेच यकृताला हानिकारक घटकांपासून वाचवते.

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.) 

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Beet juice is extremely beneficial for weight loss)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.