AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : एकाग्रता वाढविण्यासाठी ‘हे’ 4 आयुर्वेदिक उपाय करा!

एकाग्रता कमी होणे आणि विसरणे याच्या समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वयस्कर मानसांमध्ये विसरण्याची सवय प्रामुख्याने आढळते. मात्र, या स्पर्धेच्या युगात तणाव इतका वाढला आहे की, त्याचा आपल्या एकाग्रतेवर झाला आहे.

Health Tips : एकाग्रता वाढविण्यासाठी 'हे' 4 आयुर्वेदिक उपाय करा!
एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 3:59 PM
Share

मुंबई : एकाग्रता कमी होणे आणि विसरणे या समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वयस्कर मानसांमध्ये विसरण्याची सवय प्रामुख्याने आढळते. मात्र, या स्पर्धेच्या युगात तणाव इतका वाढला आहे की, त्याचा परिणाम आपल्या एकाग्रतेवर झाला आहे. यामध्ये आपण छोट्या-छोट्या गोष्टी देखील विसरतो. मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. विसरण्याचे मुख्य कारण एकाग्रतेचा अभाव असू शकतो. आपण काही घरगुती उपाय करून देखील एकाग्रता वाढू शकतो. (Do these Ayurvedic remedies to increase concentration)

ब्राह्मी

ब्राह्मी एक प्राचीन औषधी वनस्पती आहे. यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. या वनस्पतीचा औषधांसाठी हजारो वर्षांपासून वापर केला जात आहे. ब्राह्मीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. तसेच मन प्रसन्न राहून एकाग्रता वाढते. आपल्या स्मृतीशी संबंधित समस्या दूर करण्यात ब्राम्ही वनस्पतीची खूप मोठी मदत होते. वृद्धांना बऱ्याचदा स्मरणशक्ती कमी होण्यास त्रास होतो. यावेळी या वनस्पतीचे सेवन करणे त्यांच्या स्मरणशक्तीच्या समस्येवर मोठा उपाय ठरू शकते. दूध आणि पाण्यात मिसळून ब्राह्मीची पावडर खाता येते.

शंखपुष्पी

शंखपुष्पी ही आयुर्वेदिक औषधातील एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे. याचा उपयोग मनाला शांत करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी केला जातो. हे तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी कार्य करते. यासाठी आपण कोमट पाण्यात शंखपुष्पी खाऊ शकतो. याचे नियमित सेवन केल्याने नैराश्य आणि चिंता कमी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर ताणतणाव दूर करण्यासही ते खूप उपयुक्त ठरतात. विशेष म्हणजे शंखपुष्पीचा आहारात समावेश केल्याने आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते.

अश्वगंधा

वाढता ताणतणाव आपल्या शरीरावर तसेच मानसिक स्थितीवर परिणाम करतो. अशा परिस्थितीत आपण अश्वगंधासारख्या गुणकारी वनस्पतीचा वापर करून ताणतणावातून मुक्तता मिळवू शकतो. अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे जी शरीरास आतून आणि बाहेरून बरे करण्याचे काम करते. त्यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि पौष्टिक घटक असतात, जे शरीराच्या विकासास मदत करतात. याचे सेवन केल्यास आजार रोखण्यात येतात आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

तुळस

हिंदू धर्मात तुळशीचं मोठं महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचा सर्वाधिक वापर पूजा-अर्चनेत केला जातो. तुळशीमध्ये अनेक औषधीय गुण असतात. ज्यामुळे याचा वापर अनेक प्रकारच्या आजारांसाठीही केला जातो. तुळशीच्या पानांचे आपण दररोज सेवन केले तर आपली एकाग्रता वाढण्यास देखील मदत होते. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अ‍ॅडाप्टोजेन ताण कमी करण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो. तुळशीची पाने डोकेदुखीमध्ये देखील आराम देतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do these Ayurvedic remedies to increase concentration)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.