Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 4 पदार्थांचा समावेश करा!

वजन कमी करणे सोपे काम नाही. मात्र, काही टिप्स फाॅलो करून आपण वाढलेले वजन कमी करू शकता. आहारतज्ञ नेहमीच सांगतात की, वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार सर्वात महत्वाचा आहे.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये 'या' 4 पदार्थांचा समावेश करा!
आरोग्य

मुंबई : वजन कमी करणे सोपे काम नाही. मात्र, काही टिप्स फाॅलो करून आपण वाढलेले वजन कमी करू शकता. आहारतज्ञ नेहमीच सांगतात की, वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार सर्वात महत्वाचा आहे. अशा काही खास पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. जे चरबी बर्न करण्यास आणि चयापचय वाढवण्यास मदत करतात.

1. अंजीर हे स्नॅक्ससाठी आरोग्यदायी पर्याय मानले जाते. कारण त्यात कॅलरी कमी आणि चरबी कमी असते. त्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात, जे तुमच्या शरीरातील पेशींमधील हानिकारक पदार्थ कमी करण्यास मदत करतात. यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये अंजीरचा समावेश नक्की करा.

2. ग्रीन टी हे एक उत्तम पेय आहे. जे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी बर्न करण्यास मदत करते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यात भरपूर कॅटेचिन्स देखील असतात. जे तुमच्या यकृताला चरबीच्या पेशींमधून चरबी बाहेर टाकण्यास मदत करतात. तसेच या चरबीचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या ग्रीन टीमध्ये लिंबू घालू शकता.

3. अंडे एक शक्तिशाली सुपरफूड आहे. अंडी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि निरोगी चरबीने समृद्ध असतात, तसेच त्यात असलेले कोलीन चयापचय गतिमान करू शकते. यामुळे वजन कमी करण्याठी आणि चयापचय दर वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करणे फायदेशीर आहे.

4. अननसात कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अननस हे अत्यंत फायदेशीर आहे. अननसात भरपूर फायबर असते, जे पचनमार्गात अन्नाचे पचन जलद करू शकते. जठरासंबंधी आणि पाचक रसांच्या स्रावातही अननस महत्त्वाची भूमिका बजावते. आपण अननसाच्या रसामध्ये लिंबू देखील मिक्स करून पिऊ शकता.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक


Published On - 11:46 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI