AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lip Care : लिपस्टीकमुळे होतयं ओठांचं नुकसान ? या गोष्टींची काळजी घ्याल तर…

सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकचेही तोटे असू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का ? ते कोणते हे जाणून घेऊया.

Lip Care : लिपस्टीकमुळे होतयं ओठांचं नुकसान ? या गोष्टींची काळजी घ्याल तर...
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 19, 2023 | 5:42 PM
Share

Lip Care : कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये लिपस्टिकचा (lipstick) वापर दीर्घकाळापासून होत आहे. मेकअपसोबत लिपस्टिक मॅच केल्याने सौंदर्य आणखी वाढते. लिपस्टिकच्या नियमित वापरामुळे होणाऱ्या हानीमुळे लोकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. पण सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकचेही तोटे (side effects of applying lipstick ) असू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का ?

हाच प्रश्न तुमच्या मनात असेल तर हे समजून घ्या की, लिपस्टिकमुळे तुमच्या ओठांचे नुकसान होऊ शकते. पण सर्व लिपस्टिक ओठांना हानी पोहोचवतात असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल. या लेखाच्या माध्यमातून आपण नियमित लिपस्टिक लावण्याचे काय तोटे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ड्रायनेस

लिपस्टिकमध्ये असलेल्या विविध घटकांव्यतिरिक्त, असे अनेक घटक आहेत ज्यामुळे ओठांना नुकसान होते. रोज लिपस्टिक लावल्याने ओठ कोरडे होऊ शकतात. यामुळे ओठही फुटू शकतात. परंतु दर्जेदार लिपस्टिकमध्ये तेल आणि बटरसारखे अनेक मॉइश्चरायझिंग घटक असतात जे ओठांचे हायड्रेशन राखण्यात मदत करतात. याशिवाय ओठांना मॉयश्चरायझ करून कोरडेपणा कमी करता येतो.

ॲलर्जी रिॲक्शन

लिपस्टिक लावल्याने ॲलर्जी होऊ शकते, असे अनेकांचे मत आहे. बऱ्याच जणांना लिपस्टिकची ॲलर्जी असू शकते, परंतु ते लिपस्टीकच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असते. मोठ्या आणि सुप्रसिद्ध कॉस्मेटिक कंपन्या सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या लिपस्टिकने ॲलर्जीचा धोका कमी असतो.

या गोष्टींची घ्या विशेष काळजी

हायड्रेशन : ओठांना कोरडेपणापासून वाचवण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवा. दिवसभर भरपूर पाणी प्या. जेव्हा तुमचे ओठ हायड्रेटेड असतात, तेव्हा ते कोरडे होण्याची आणि फाटण्याची शक्यता कमी असते.

एक्सफोलिएशन : स्क्रबर किंवा मऊ ब्रशने ओठ एक्सफोलिएट करा. यामुळे ओठांच्या त्वचेच्या मृत पेशी बाहेर पडतात आणि त्यामुळे ओठ मऊ होतात. यामुळे लिपस्टिक फाइन लाइन्समध्ये जमा होत नाही.

लिप बाम लावा : लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लिप बाम किंवा कंडिशनर लावा. यामुळे ओठांचा कोरडेपणा कमी होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.